पाकिस्तानातील अब्बांची आठवण होईल, अशी शिक्षा देणार…नागपुरात हिंसाचार करणाऱ्यांना नितेश राणेंचा इशारा

Nagpur Violence: नागपूरमध्ये झालेला हिंसाचाराची घटना ही पूर्वनियोजित होती. समाज कंटकांनी पोलिसांवर कुऱ्हाडीने हल्ले केले आहेत. थेट पोलिसांवर हल्ला केल्यानंतर सरकार म्हणून आम्ही शांत राहणार का? पाकिस्तानमधील अब्बांची आठवण कराल, अशी कारवाई आता होणार आहे. जिहादी मानसिकात असणाऱ्या सर्व कारट्यांना चोप देणार आहे. त्यांना कोणी हिंमत दिली आहे. त्यांची हिंमत तोडण्याचे काम फडणवीस सरकार करणार आहे. समाज कंटकांकडे ट्रकभर दगडे आली कुठून? पार्किंगमध्ये त्या लोकांची वाहने काल का नव्हती? या सर्वांची चौकशी होणार आहे, असे मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना मंगळवारी सांगितले.

काय म्हणाले राणे?

नितेश राणे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोध करत आहे, त्यांच्या वक्तव्यामुळे हिंसाचार भडकाला आहे? असा आरोप विरोधक करत आहे. त्यावर बोलताना राणे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांमध्ये मी आहे. माझे मुख्यमंत्री मला काय बोलणार? त्याची चिंता तू करायची नाही. माझ्या तोंडी कोणी लागू नये, असा टोला नीतेश राणे यांना विरोधकांना लावला. आदित्य ठाकरे म्हणतात, भाजपला महाराष्ट्राला पेटता मणिपूर करायचे आहे, त्यावर बोलताना राणे म्हणाले, त्या व्यक्तीला पेटवणे काय हे माहिती नाही. त्यांना आधी कंठ तरी फुटू द्या, असा टोला नितेश राणे यांनी लावला.

नितेश राणे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पायऱ्यांवरील आंदोलन झाले. त्यावर नितेश राणे म्हणाले, सभागृहाबाहेर काय झाले त्याला मी उत्तर देत नाही. सभागृहात कोणीही माझा राजीनामा मागितला नाही. त्यांना उत्तर मी त्या ठिकाणी दिले असते. पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्यांना हवे तर नास्ता द्या. मत्स खात्याचा मंत्री म्हणून मी मासे पाठवतो, असा टोला राणे यांनी लगावला.

नागपुरात हिंदुत्ववादी संघटनांनी सकाळी केलेले आंदोलन औरंगजेब कबरीच्या विरोधात केले. मग त्या ठिकाणी संध्याकाळी प्रत्युत्तर म्हणून हिंसाचार केला. मुळात हे सर्व काँग्रेसचे पाय आहे. त्यांनी पुस्तकांमधून चुकीचा इतिहास शिकवला आहे. आता आमचे शासन जिहादी मानसिकता असणाऱ्या लोकांना सरळ करणार आहे. महाराष्ट्रात राहून शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या विरोधात बोलणाऱ्यांची गय करणार नाही, असे राणे म्हणाले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)