Vaishnavi Hagawane Death Case : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणात सासरच्या गुन्हा दाखल असलेल्या सर्व आरोपींना अटक झाली आहे. या प्रकरणात सहभाग असलेला निलेश चव्हाण याच्या अडचणी वाढल्या आहेत. वैष्णवीचे बाळ काही दिवस निलेश चव्हाणकडे होते. त्यामुळे बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी निलेश चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. निलेश चव्हाण हा फरार झाला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहे.
वैष्णवी यांच्या मृत्यूनंतर तिचे बाळ निलेश चव्हाण याच्याकडे असल्याचे समोर आले होते. निलेश चव्हाण याच्याकडे असताना बाळाची हेळसांड झाली, अशी तक्रार कस्पटे कुटुंबियांनी केली होती. त्यानुसार बावधन पोलिसांनी गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ केली आहे. वैष्णवी यांच्या नऊ महिन्यांच्या मुलाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याच्या कारणावरून पोलिसांनी या प्रकरणात बाल न्याय कायदा, २०१५ मधील ७५, ८७ ही कलमे वाढवली आहेत. हुंडाबळी प्रकरणातील दाखल गुन्ह्यात कलम वाढवण्यात आले आहे. तसेच बाळाला बंदिस्त परिस्थित ठेवल्याप्रकरणी सुद्धा कलम वाढण्यात आले आहे.
तीन गाड्यांपैकी एक गाडी सुशीलच्या नावावर
वैष्णवी मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेंद्र आणि सुशील हगवणे हे फरार होते. या दोघांना अटक करण्यात आली. फरार असल्याच्या काळात राजेंद्र हगवणे याने वापरलेल्या गाड्यांपैकी एक गाडी राजेंद्र हगवणे याचा मुलगा सुशील हगवणे याच्या नावाने नोंद झाली आहे. परंतु बाकी दोन गाड्या वेगवेगळ्या नावाने नोंदवल्या गेल्या आहेत. Endevoer (MH 12 SS 3000) गाडीचा मालक सुशील राजेंद्र हगवणे आहे. तर Baleno (MH 12 SY 1123) गाडीचा मालक आशीष शिंदे तर थार (MH 12 WH – 0404) या गाडीचा मालक संकेत नरेश चोंधे आहे.
त्या फार्म हाऊसची झडती
पिंपरी-चिंचवड पोलीस मावळातील पवनानगर येथे असलेल्या बंडू फाटकच्या फार्म हाऊसवर पोहचले. फरार झाल्यानंतर राजेंद्र हगवणे 18 मे रोजी बावधनमधून थेट मावळमधील बंडू फाटक याच्या फार्म हाऊसवर गेला होता. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेची टीम पवनानगरच्या बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर पोहचली. त्यानंतर पोलिसांनी तपासणी केली.