राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. छगन भुजबळांच्या नाराजीचे पडसाद राज्यभरात उमटत आहे. “जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना”, असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले होते. यामुळे छगन भुजबळ वेगळी वाट धरणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच आता नाराज झालेले छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत.
बातमी अपडेट होत आहे…