Neelam Gorhe: उध्दवसाहेबांवर पुन्हा माफी मागण्याची वेळ आणू नका; डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या दानवेंना कानपिचक्या

प्रतिनिधी, मुंबई

तुमच्यामुळे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना माफी मागावी लागली, यापूर्वी साहेबांनी कधीही कुणाची माफी मागितली नव्हती, त्यांच्यावर पुन्हा ही वेळ आणू नका, हे तुमच्या राजकीय कारकीर्दीसाठी चांगले नाही, असे म्हणत विधान परिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना कानपिचक्या दिल्या.

अतिरिक्त अर्थसंकल्पावर अंबादास दानवे यांनी शुक्रवारी भाषण केले. भाषणादरम्यान, शालेय गणवेशाबाबतीत टीका करताना त्यांनी सोबत आणलेले गणवेशाचे कापड सभागृहात दाखवले. याला सत्ताधारी पक्षातून मंत्री शंभूराजे देसाई, आमदार प्रवीण दरेकर यांनी जोरदार हरकत घेतली. तेव्हा दानवे यांनी इतका गदारोळ कशासाठी मी रिव्हॉल्व्हर आणलेय का, असा उलट प्रश्न विचारला. यावरुन सभागृहात जोरदार गदारोळाला सुरूवात झाली. तालिका सभापती विलास पोतनीस यांना त्याविषयी निर्णय घेण्यास सांगण्यात आले.
Rohit Sharma Felicitation Event: बरं झालं सूर्याच्या हातात बॉल बसला, नाही तर पुढे त्याला मी बसवला असता; विधानभवनात रोहित शर्माची तुफान बॅटिंग, पाहा संपूर्ण भाषण

दरम्यान, सभापती डॉ. नीलम गोऱ्हे या आसनस्थ झाल्या आणि त्यांनी नेमके काय झाले याची विचारणा केली. मंत्री देसाई यांनी घडलेला प्रकार सभापतींना सांगितल्यावर त्यांनी दानवे यांनी पूर्वपरवानगी न घेता सभागृहात बाहेरील वस्तू आणल्याबद्दल दानवे यांना समज देत पुन्हा असे न करण्यास सांगितले.
Surya Kumar Yadav: विधानभवनात सूर्यकुमारचा मुंबई पोलिसांना सॅल्युट; म्हणाला, काल तुम्ही जे काही केले, ते कोणीच करू शकत नाही

तसेच त्या म्हणाल्या, दानवे तुमच्या मागल्या प्रकारामुळे (लाड यांना अपशब्द उच्चारणे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना माफी मागावी लागली. तुमच्यामुळे पक्षप्रमुखांनी माफी मागावी, हे काही बरे नाही. याआधी साहेबांनी कधीही माफी मागितली नव्हती. तुम्ही त्यांच्यावर पुन्हा माफी मागण्याची वेळ आणू नका हे तुमच्या राजकीय कारकीर्दीसाठीही चांगले नाही, अशा कानपिचक्या त्यांनी दिल्या. तसेच तुम्ही काहीही सभागृहात बोलता तुम्हाला असे दाखवायचे आहे का, की तुम्हाला कोणीही काहीही बोलू शकत नाही, असाही प्रश्न गोऱ्हे यांनी विचारला.

अनिल परब यांच्याशी शाब्दिक चकमक

दानवे अर्थसंकल्पावर भाषण करत असताना सभागृहात मंत्री उपस्थित नसल्याबाबत आमदार अनिल परब यांनी हरकत घेतली. यावर तालिका सभापती अमोल मिटकरी यांना सभागृह तहकूब करण्याची मागणी मुनगंटीवार यांनी केली. सभापती डॉ. गोऱ्हे त्यावेळी सभागृहात आल्या आणि परब यांना मंत्री उपस्थित असल्याचे स्पष्ट केले. परंतु, तरीही परब यांनी हरकत कायम ठेवली, त्यावरुन गोऱ्हे यांच्याशी शाब्दिक चकमक झडली. त्यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी, उध्दव साहेबांना तुम्ही चांगले विरोधी पक्षनेते आहात, असे दाखवायचे असेल पण तुमचे अंतर्गत राजकारण इथे आणू नका, असे म्हणत त्यांना आसनस्थ होण्यास सांगितले.