नरेश अरोरा, अजित पवारImage Credit source: Facebook
लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या पर्सनॅलिटीमध्ये लोकांना बदल दिसला. लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर अजित पवार हे गुलाबी जॅकेटमध्ये दिसले. अजित पवार यांच्यासाठी ‘गुलाबी कॅम्पेनिंग’ राबवणारे राजकीय रणनीतीकार नरेश अरोरा यांनी निवडणुकीवर भाष्य केलं आहे. अजित पवार यांच्या ‘गुलाबी कॅम्पेनिंग’वर देखील नरेश अरोरा यांनी सविस्तर माहिती दिली आहे. अजित पवारांना चेंज करणारा अवलिया आहेत… दादांना मी काहीही चेंज केलं नाही. मात्र दादांचा रोल चेंज झालाय. आता म्हणून दादांमध्ये बदल झाला आहे. ते पक्षाचे अध्यक्ष झाले आहेत. दादांनी त्यांचा रोल समजून घेतला. अजित दादा आता पक्षाचे अध्यक्ष झाल्यामुळे त्यांचा हा रोल चेंज झाला आहे, असं अरोरा म्हणालेत.
मुखऱ्यमंत्रिपदाबाबत काय म्हणाले?
महायुतीला विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळालं. आता राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार? याबाबत चर्चा होत आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत नरेश अरोरा यांनी मोठं विधान केलं आहे. लोक भावना आहे की अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत. मात्र यासाठी नंबर हे खूप महत्त्वाचे असतात, असं अरोरा म्हणाले.
निवडणुकीसाठी अजित पवारांची रणनिती काय होती?
अजित पवार राजकारण शरद पवार यांच्याकडून शिकले. दादांनी ठरवलं होतं मी कुणावर टीका करणार नाही. दादा स्वतःच्या कामावरती गर्व करतात. दादांनी आपल्या कामावर खूपच केला आणि त्याचाच हा परिणाम दिसून आला. परिवारांच्या विरोधात लढणं दादांसाठी खूप कठीण होतं. त्यासाठी दादांनी दोन-तीन वेळा माफी सुद्धा मागितली होती. विधानसभेत यांचा पुतण्या समोर उभा होता त्यामुळे टीका न करता त्यांनी आपलं काम लोकांना सांगितले. त्यांच्या स्वतःची भावना होती की परिवारांचे टीका करू नये, असं नरेश अरोरा म्हणालेत.
विधानसभेत बजेट सादर करताना दादांनी गुलाबी जॅकेट घातलं होतं. म्हणून आम्ही ठरवलं की तो रंग लोकांच्या लक्षात रावा त्या बजेटमध्ये खूप साऱ्या योजना लोकांसाठी आणल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये सहा पार्टी आहेत. आपला नेता लक्षात यावा यासाठी हा रंग निवडला. दादाला सुद्धा पिंक रंग आवडला. गुलाबी रंग लाडकी बहीण योजना या फक्त समोर दिसल्या. वेगवेगळ्या प्रकारे कॅम्पियन केलं गेलं. ते समोर दिसलं नाही.. आम्ही घराघरात जाऊन कॅम्पेनिंग केलं. महायुती मधल्या पदाधिकाऱ्यांसोबत कोऑर्डिनेशन करणं हे सगळं यांनी म्हटलं आहे, असं अरोरा म्हणाले.