स्थापनेचा दावा कधी करणार? महायुतीतील कुणाचे उमेदवार संपर्कात?; नाना पटोले यांच्या विधानाने खळबळ

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येण्यास अवघे काही तास बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. आमदार किती निवडून येणार हा आकडा अजून यायचा आहे. पण त्या आधीच राजकीय पक्षांनी सत्ता स्थापनेबाबतचे प्लान तयार केले आहेत. आमदार कुणाच्याही गळाला लागू नये म्हणून एअर लिफ्टिंगपासून ते हॉटेल पॉलिटिक्सपर्यंतच्या गोष्टी करण्यात येणार आहेत. तसेच 26 तारखेपर्यंतच सरकार स्थापन करण्याची मुदत असल्याने लवकरात लवकर सत्तेचा दावा करण्याच्याही हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सरकार कधी स्थापन करणार याबाबतचं मोठं विधान केलं आहे. तसेच महायुतीतील एका बड्या पक्षाचे उमेदवारही आमच्या संपर्कात असल्याचा दावा पटोले यांनी करून खळबळ उडवून दिली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे. 26 तारखेपर्यंत सरकार स्थापन करायचं आहे. आमच्या आमदारांना तात्काळ मुंबईत आणणार आहोत. वेळ कमी असल्याने आमदारांना तातडीने मुंबईत आणलं जाईल. त्यांना मुंबईत आणण्याची व्यवस्था केली जाणार आहे. उद्या दुपारपर्यंत निकाल आल्यावर तातडीने सर्व आमदारांना बोलावून सरकार स्थापनेसाठी त्यांच्या सह्या घेऊन. उद्याच रात्री राज्यपालांना सरकार स्थापनेचं पत्र देणार आहोत, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.

शिंदे यांचे उमेदवार संपर्कात

भाजपने काही ठिकाणी एकनाथ शिंदे यांची फसवणूक केली आहे. त्यांनी शिंदेंच्या उमेदवारांऐवजी अपक्षांना पाठिंबा दिला आहे. हा प्रकार खूप ठिकाणी घडला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे उमेदवार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे.

उमेदवारांशी बोलणार

आज दुपारी आम्ही उमेदवारांशी चर्चा करणार आहोत. मतदानाची प्रक्रिया आहे, त्यात त्रुटी राहू शकतात त्याची भीती आहे, हेच उमेदवारांना समजून सांगणार आहोत. कोणत्या टेबलवर काय कराव, कोण माणसं बसवली पाहिजे हे सांगणार आहोत, अशी माहितीही नाना पटोले यांनी दिली.

आयोग जबाबदार राहील

निवडणूक आयोगाची यंत्रणा चुकीची आहे. त्यामुळेच मतदानाची आकडेवारी कमी जास्त सांगितली जात आहे. लोकसभेतही असाच प्रकार झाला होता. तक्रार केली तर आयोग म्हणते आम्ही बरोबर आहोत. म्हणून आम्ही फॉर्म 17 सी कंपल्सरी केला आहे. आमच्या सर्व उमेदवारांकडे 17 सी जमा केला आहे. त्यामुळे मतदानाची तफावत आली तर तिथेच ही तफावत सापडली जाईल. 17 सी हा खऱ्या अर्थाने महत्त्वाचा दस्ताऐवज आहे. तो आमच्याकडे आहे. मतदान वाढलं तर त्याला निवडणूक आयोग जबाबदार राहील, असं ते म्हणाले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)