Nagpur Violence : नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी कुठले ? पोलिसांनी दिले महत्वाचे अपडेट्स

औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून राज्यात वातावरण तापलेलं असतानाच सोमवारी नागपूरमध्ये मोठा हिंसाचार झाला. नागपूरच्या महाल भागात मोठा हिंसाचार झाला, दोन गटांमध्ये झालेल्या या राड्यातून तुफान दगडफेक झाली. पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले, पोलिसांवरही हल्ला करण्यात आला.जाळपोळ झाली. अनियंत्रित जमावाला आवरताना पोलीस, अग्निशमन दलाचे जवानही या हिंसाचारात जखमी झाले. या हिसांचारामुळे नागपूरमध्ये अजूनही तणावाचं वातावरण असून अनेक भागांत अद्यापही संचारबंदी आहे.

दरम्यान याप्रकरणी पोलिसांची नुकतीच पत्रकार परिषद झाली, त्यावेळी सायबर विभागाचे डीसीपी लोहित मतांनी यांनी महत्वाची माहिती दिली. या राड्यातील आरोपी नागपूरचे नसल्याचा महत्वाचा खुलासा त्यांनी केला. सर्व तपास सुरू असून घोषणा देणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसेच यापुढे कोणतीही अनुचित घटना घडू नये, तेढ वाढू नये यासाठी सोशल मीडियावरील पोस्ट ब्लॉक करण्याचं काम सुरू आहे, असंही मतांनी यांनी नमूद केलं.

ही बातमी अपडेट होत आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)