अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मैत्री आहे. त्यामुळे ट्रम्प नाव भारताही प्रचलित आहे. ट्रम्प ब्रँड अंतर्गत निवासी सदनिका दीर्घकाळापासून देशात उपलब्ध आहेत, परंतु कोणतीही व्यावसायिक मालमत्ता नव्हती. आता ट्रम्प यांच्या नावाचे देशात पहिले व्यावसायिक कार्यालय (कमर्शियल प्रॉपर्टी ) भारतात बांधली जाणार आहे. पुणे शहरात हे व्यावसायिक कार्यालय बांधले जाणार आहे. ट्रम्प ऑर्गनायझेशनने 10 वर्षांपूर्वी भारतातील लक्झरी हाउसिंग मार्केटमध्ये प्रवेश केला होता. आता ते पुण्यात ट्रम्प वर्ल्ड सेंटर सुरू करून व्यावसायिक मालमत्ता बाजारातही उतरत आहेत.
ट्रम्प इंडियाचे भागेदार ट्रिबेका डेवलपर्सचे संचालक कल्पेश मेहता यांनी पुण्यात ट्रम्प व्यावसायिक कार्यालयाची घोषणा केली. यावेळी ते म्हणाले, पुणे येथील डेव्हलपर कुंदन स्पेसेससोबत कोरेगाव पार्क भागात दोन व्यावासायिक टावर बांधण्यात येणार आहे. अमेरिकेच्या बाहेर भारतात ट्रम्प हे बँड मोठे आहे. या प्रकल्पातून 289 मिलियन डॉलरची कमाई होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त आहे.
कसे असणार ट्रम्प वर्ल्ड सेंटर
पुण्यातील ट्रम्प वर्ल्ड सेंटर हे 16 लाख वर्ग फुट भागात तयार करण्यात येणार आहे. 27 मजली ही कर्मिशयल टॉवर असणार आहे. एका टॉवरमध्ये लहान-मोठे ऑफिसेस असणार आहेत. ते विकत घेता येणार आहे. दुसऱ्या टॉवरमध्ये मोठे कार्यालय असतील. ते भाडे तत्वावर दिले जाणार आहेत. यामुळे वेगवेगळ्या पद्धतीच्या व्यवसायाची गरज पूर्ण होणार आहे.
ट्रंप ऑर्गनाइजेशनचे एग्झीक्यूटिव्ह व्हीपी एरिक ट्रम्प यांनी म्हटले की, भारतात ट्रम्प बँड पसंतीला उतरला आहे. अनेक गृहप्रकल्प या नावाने सुरु करण्यात आले आहे. त्यानंतर आता कार्यालय बनवण्यात येत आहे. भारतात पहिले कमर्शियल प्रोजेक्ट सुरु करताना आम्हाला अभिमान वाटत आहे.
ऑगस्ट 2014 मध्ये डोनाल्ड ट्रम्प मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी लोढा ग्रुपसोबत वरळी येथे 75 मजली आलीशान ‘ट्रम्प टॉवर’चे उद्घाटन केले होते. हा लग्झरी गृह प्रकल्प आहे. तो खूप यशस्वी ठरला. आता त्यानंतर कमर्शियल प्रॉपर्टीत ट्रम्प कंपनी उतरत आहे.