Mumbai Water Supply : पाणी भरुन ठेवा! मुंबईच्या पूर्वेकडील भागात 24 तास पाणीपुरवठा बंद, महापालिकेचा अलर्ट

मुंबई : घाटकोपर, भांडूप आणि मुलुंड मधील रहिवाशांना पुढील दोन दिवस पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे. याबद्दल महापालिका पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या सूचनेनुसार गोरेगांव-मुलुंड ते मुलुंड लिंक रोड प्रकल्पांतर्गत फोर्टिस रुग्णालय ते मुलुंडमधील औद्योगिक क्षेत्रादरम्यानच्या १२०० मिमी व्यासाची पाईपलाईन वळवण्याचे काम केले जाणार आहे. यामुळे दोन दिवस पाणीपुरवठा खंडीत राहणार असल्याच्या सूचना पालिका प्रशासनाने जारी केल्या आहे.

२४ आणि २५ मे असे दोन दिवस पालिकेने २४ तासांसाठी घाटकोपर, भांडूप आणि मुलुंड विभागात पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे ठरवले आहे. दरम्यान नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन देखील केले आहे.
Maharashtra Water Crisis: राज्यात भीषण पाणीटंचाई; धरणांत २४ टक्केच पाणीसाठा, टॅंकरची संख्या हजारांत

या विभागांत येणार नाही पाणी

पालिका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मुलुंड गोरंगाव जंक्शन नजीकच्या क्षेत्रात, लाल बहादुर शास्त्री मार्ग च्या नजीकच्या क्षेत्रात, जेएन मार्ग, देवीदयाल मार्ग, डंपिंग ग्राउंड रोड, नाहुर गांव वॉर्डसहित बहुतांश भागांत २४ तारखेला पाणी पुरवठा खंडित राहील. तर घाटकोपर विभागात विक्रोळी गाव पूर्व, गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज अस्पताल या परिसरात २५ मे ला पाणी पुरवठा बंद राहणार. भांडूप वॉर्ड अंतर्गत असलेल्या नाहूर पूर्व, भांडूप पूर्व, कांजूरमार्ग पूर्व, टागोर नगर, कन्नमवार नगर विक्रोळी पूर्व मधील बिल्डींग नंबर १ ते ३२ आणि २०३ ते २१७ या परिसरांत पाणी पुरवठा बंद राहणार.

भांडूप वॉर्ड अंतर्गत मुलुंड-गोरेगाव जंक्शन क्षेत्र, सीईटी टायर मार्ग क्षेत्र, गांव रोड, दत्त मंदिर मार्ग, अंजना इस्टेट, शास्त्री नगर, उषा नगर, लाल बहादुर शास्त्री मार्ग निकटवर्ती क्षेत्र, सोनापुर, गांवदेवी मार्ग, जंगल मंगल मार्ग, लेक मार्ग, द्रक्षा बाग, काजू हिल, जनता मार्केट, टैंक रोड क्षेत्र, महाराष्ट्र नगर, कोकण नगर, सह्याद्री नगर आणि प्रताप नगर मार्ग क्षेत्रात २५ तारखेला पाणीपुरवठा खंडीत राहील. २४ तारखेला सकाळी ११.३० पासून २५ तारखेला सकाळी ११.३० पर्यंत पाणीपुरवठा खंडीत राहणार असल्याचे महापालिकेने जारी केले आहे.