मार्वे मार्गावरील शिंदे गॅरेज येथे ९०० मिमी X ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी जोडणी व जुनी ९०० मिमी जलवाहिनी खंडित करणे, मार्वे मार्ग व लागून मार्ग छेदिका येथे ९०० मिमी X ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी जोडणी व जुनी ९०० मिमी जलवाहिनी खंडित करणे, मार्वे मार्ग व अली तलाव मार्ग छेदिका येथे ४५० मिमी X ४५० मिमी व्यासाची जलवाहिनी जोडणी व जुनी ४५० मिमी जलवाहिनी खंडित करणे आणि मार्वे मार्ग ते ब्ल्यू हेवन हॉटेलसमोर ९०० मिमी X ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम व जुनी ९०० मिमी जलवाहिनी खंडित करण्याची कामे केली जाणार आहेत. या कामामुळे भूमिगत गळतीचे प्रमाण कमी होऊन जलवाहिनीतील पाण्याचा दाब वाढण्यास मदत होईल. एकंदरीतच मालाड पश्चिम भागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून चार ते पाच दिवस पाणी गाळून व उकळून वापरावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.
मालाड/पी उत्तर
– अंबोजवाडी (वेळ रात्री ११.३० ते मध्यरात्रीनंतर १२.३५) २७ मे रोजी पाणीपुरवठा बंद.
– आजमीनगर (पाणीपुरवठ्याची वेळ रात्री १२ ते मध्यरात्रीनंतर १.३०) २८ मे रोजी पुरवठा बंद.
– जनकल्याणनगर (वेळ रात्री १.३० ते मध्यरात्रीनंतर ३) २८ मे रोजी पुरवठा बंद.
– मालवणी (वेळ सकाळी ८ ते सकाळी ११.५०) २८ मे रोजी पाणीपुरवठा बंद.
– अली तलाव मार्ग, गावदेवी मार्ग, इनासवाडी, खारोडी, राठोडी गाव, मालवणी गाव, खारोडी गाव, मनोरी, पटेलवाडी, शंकरवाडी, मार्वे गाव, मढ क्षेत्र, मनोरी गाव (वेळ दुपारी ४.२० ते रात्री १०)२८ मे रोजी पाणीपुरवठा बंद.
कांदिवली/आर दक्षिण
– छत्रपती शिवाजी महाराज संकुल, न्यू म्हाडा ले आऊट (वेळ मध्यरात्रीनंतर १.३० ते मध्यरात्रीनंतर ३) २८ मे रोजी पाणीपुरवठा बंद.
बोरिवली/आर मध्य
– गोराई गाव, बोरिवली (वेळ सायंकाळी ५.३० ते सायंकाळी ७.३०) २८ मे रोजी पाणीपुरवठा बंद.