अनेक ठिकाणी आज सकाळपासून कमी जास्त प्रमाणात पावसाने कोसळण्यास सुरूवात केली. अनेक दिवसांच्या खंडानंतर पडलेल्या पावसामुळे वातावरण प्रफुल्लीत झाले होते. जरासा गारवाही जाणवायला लागला होता. आज हवामान खात्याने मुंबईला यल्लो अलर्ट दिला आहे. IMD ने येत्या आठवड्यात मुंबईत मुसळधार ते हलक्या सरींच्या आणि तीव्रतेसह पाऊस आणि ढगाळ हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. येत्या 24 तासात मुंबईत ,मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सकाळपासून मुंबईत बँटिंग
मात्र सकाळपासून सुरू केलेल्या बँटिंगमुळे मुंबईतील सखल भागात पाणी साजले होते. त्यामुळे, विरोधकांना नालेसफाई नाही झाल्याचे कारण मिळाले. आज दक्षिण मुंबईत पाऊस आणि राजकीय घडामोडींमुळे काही काळ वाहतूक कोंडींचा सामना सामान्य नागरिकांना करावा लागला. हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार उद्या घरातून बाहेर पडताना छत्री, रेनकोट न्यायला विसरू नका. तसेच महत्त्वाच्या कामांना जाण्यापूर्वी जरा हवामानाचा अंदाज पाहूनच बाहेर पडा. उद्याचे मुंबईतील हवामान कसे असेल याचा एक चार्ट आम्ही देत आहोत.
मुंबईत उद्याचे हवामान कसे असेल?
देशात समाधानकारक पावसाचा अंदाज
आज कोकण किनारपट्टीवर देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह आज कोकणात देखील यल्लो अलर्ट देण्यात आला आहे आहे. हवामान विभागाच्या यंत्रणेने व्यक्त केलेल्या शक्यतेनुसार या वर्षी देशात सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक आहे. तर काही ठिकाणी सरासरीऐवढा पाऊस आणि काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस असे तक्त्यांच्या आधारे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. ‘एल निनो’ स्थिती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तटस्थ राहू शकते. तर पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच जुलै किंवा ऑगस्टमध्ये ‘ला निना’ स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ला निना स्थिती देशातील यंदाच्या मॉन्सूनसाठी चांगली असल्याचेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.