महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. एकूण 288 विधानसभा मतदारसंघात 4140 उमेदवार रिंगणात आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्याच्या निकालाकडे सगळ्यांच जास्त लक्ष आहे. मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत, तर ठाणे जिल्ह्यात 18 जागा आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्यातून येतात. त्यामुळे ठाण्याच्या निकालाकडे सगळ्यांच लक्ष आहे. मुंबईत 36 जागांसाठी एकूण 420 उमेदवार रिंगणात आहेत. मुंबई कोणाची ते उद्या स्पष्ट होईल. शिवसेना एकसंध असताना मुंबईवर ठाकरेंच वर्चस्व होतं. पण शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे की एकनाथ शिंदे, या प्रश्नाच उत्तर आज मिळेल. महाविकास आघाडीकडून मुंबईत उद्धव ठाकरे गट सर्वाधिक 22 जागांवर निवडणूक लढवत आहे. काँग्रेस, शरद पवार गट आणि समाजवादी पार्टी यांचे 11 उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना शिंदे गट 15 आणि भाजपाने 18 जागांवर उमेदवार उभे केले आहेत.