‘छावा’ चित्रपट व्हायरल करणाऱ्याला मुंबई पोलिसांचा दणका, केली मोठी कारवाई

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. मात्र या चित्रपटाची चित्रफीत बेकायदेशीरपणे सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई सायबर पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यात ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर माणिक रंधावन (रा. दौंड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सागर रंधावनने ‘छावा’ चित्रपट सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी होस्टिंगर या वेबसाईटचा वापर केला. त्यानंतर त्याने एक ॲप तयार केले. यानंतर विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत या चित्रपटाच्या लिंक्स अपलोड केल्या.

या चित्रपटाची लिंक मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर ऑगस्ट इंटरटेनमेंट या चित्रपट निर्मिती कंपनीने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. यानंतर पोलिसांनी सागर रंधावन याला अटक केली. याप्रकरणी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या या घटनेचा पुढील तपास मुंबई सायबर पोलीस करत आहेत.

बातमी अपडेट होत आहे…

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)