मुंबई: ईव्हीएम मोबाईने अनलॉक केला असा प्रचार सध्या केला जात आहे. परंतु, ईव्हीएममध्ये कुठल्याही प्रकारे छेडछाड करता येत नाही. निकालाच्या दिवशीही असेच खोटे आरोप करण्यात आले होते. सर्व प्रक्रिया नेते आणि कार्यकर्त्यांपुढे झाली होती. परंतु, उबाठा उमेदवार पराभूत झाल्यानंतर जाणीवपूर्वक खोट्या बातम्या पेरण्याचे काम सुरू झालं आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केला आहे. तंत्रज्ञानाची माहिती असल्याचा दावा करणाऱ्या राहुल गांधी, आदित्य ठाकरे आणि अखिलेश यादव सारखे नेतेही यावर ट्विट करत आहेत यावरुनच हा बनाव आहे हे सिध्द होते, असेही निरुपम म्हणाले.
उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तीकर यांच्यातील लढतीत वायकर यांचा ४८ मतांनी विजय झाला होता. या निकालावर अजूनही वाद सुरू असून मतमोजणी केंद्रात वायकर यांच्या एका सहाय्यकाने मोबाईल फोन वापरल्यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा फोन ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी वापरण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात येत असून वृत्तपत्रांत छापून आलेल्या बातम्यांचा आधार घेत विरोधी पक्षांनी शिवसेना आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे.याविषयी बोलताना शिवसेना नेते निरुपम यांनी, निकालाच्या दिवशीही मतमोजणी होण्यापूर्वीच अमोल कीर्तीकर दोन हजार मतांनी जिंकले असे सांगण्यात आले. यानंतर ईव्हीएम मशीन वर कीर्तीकर याना एक मत जास्त मिळालं म्हणून ते विजयी म्हणून घोषणा करण्यात आली. त्यावेळी पोस्टल मतं मोजण्यात आलेली नव्हती, त्याच्या मोजणीनंतर वायकर ४८ मतांनी विजयी झाल्याचे घोषित केले. परंतु, निवडणूक केंद्रात एका व्यक्तीने फोन वापरल्याबद्दल गुन्हा दाखल झाला असून त्याची चौकशी सुरू आहे. परंतु, वापरण्यात आलेल्या फोनवर ईव्हीएम अनलॉक करणारा ओटीपी येत होता, असा हास्यास्पद दावा करण्यात येत असल्याचे निरुपम म्हणाले.

अशाप्रकारे ईव्हीएम लॉक-अनलॉक होत नाही. मोबाईल कुणाचा होता, तो वायकर यांच्या मेहुण्याचा होता का? याची चौकशी करायला हवी, परंतु, ओटीपीचा दावा खोटा असल्याचे निरुपम म्हणाले. याप्रकरणात सीसीटीव्ही हे चित्रीकरण खूप महत्त्वाचे असून त्याआधारे नेमके काय झाले हे स्पष्ट होईल, परंतु, त्याआधीच शिवसेनेला बदनाम करण्यात येत असून जाणीवपूर्वक माध्यमांतून बातम्या छापून आणल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. याविषयी पक्षातर्फे काय कारवाई करायची हे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट करण्यात येईल, असेही निरुपम म्हणाले.