Mumbai Hit And Run: दादा.. नाही सोडायचं त्यांना, आदित्य ठाकरेंसमोर कावेरी नाखवांच्या मुलीचा टाहो

मुंबई: वरळी हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी आरोपी मिहीर शहाला अटक केली असून त्याने पोलिसांसमोर आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. त्यानंतर आज शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी या हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटुंबीयांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचं सांत्वन केलं. आदित्य ठाकरेंसोबत काँग्रेसचे नेत अस्लम शेख देखील यावेळी उपस्थित होते

आदित्य ठाकरेंसमोर नाखवे कुटुंबाचा टाहो

आदित्य ठाकरे हे वरळी येथील नाखवा यांच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत होते. त्यांनी कुटुंबीयांशी बातचीत केली. यावेळी कुटंबीयांनी आदित्य ठाकरेंसमोर एकच टाहो फोडला. कावेरी नाखवे यांच्या आई म्हणाल्या की जे माझ्यासोबत मुलीसोबत केलं तेच त्यांच्यासोबत केलं पाहिजे, तेव्हा त्यांना कळेल.
Mumbai Hit And Run: होय, मीच कार चालवत होतो! तेव्हा खूप घाबरलेलो; मिहीर शहाने कबुलीत सारं सांगितलं, पण…

प्रदीप नाखवेंचे अश्रू थांबेनात

तर, कावेरी नाखवा यांचे पती प्रदीप नाखवा ज्यांची ही सारी घटना आपल्या डोळ्यासमोर घडताना पाहिली, त्यांच्या अश्रूचा बांध फुटला. माझ्या डोळ्यासमोर त्याने तिला फरफटत नेलं, जर कुठल्या गरीबाने हे केलं असतं तर आतापर्यंत तो तुरुंगात असता, असं म्हणत त्यांनी हंबरडा फोडला.

कावेरींच्या लेकीची आदित्य ठाकरेंकडे मागणी

यावेळी कावेरी यांची लेकही तिथे होती. रडता रडता ती आदित्य ठाकरेंना म्हणाली, दादा.. नाही सोडायचं त्यांना, ते सुटायला नको. यावेळी काही क्षण आदित्य ठाकरेंनाही भरुन आलं आणि ते म्हणाले, त्यांना सोडायचं नाहीच आहे, शिक्षाच द्यायची आहे, सगळ्यात कठोर शिक्षा आपण त्यांना देऊ.

त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, माझ्याकडे शब्द नाहीयेत, त्यांना भेटल्यावर मन हलून जात आहे. मी तर म्हणेन हा मर्डरच आहे. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. कुटुंबीयांच्या डोळ्यात राग, दु:ख दिसत आहे. प्रदीप नाखवांनी तर सगळं आपल्या डोळ्यांसमोर पाहिलं. नरकातून राक्षस आला तरी तो असं करणार नाही, इतकी बेकार हिट अँड रन मुंबईत होऊ शकते, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त केला.