Mumbai Hit And Run: आधी जुहूत दारु ढोसली, मग मालाड गाठलं, तिकडे कारमध्ये दोघांनी…; मिहिर शहाचा पाय आणखी खोलात

मुंबई: वरळी हिट अँड रन प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. जुहू येथील बारमध्ये जॅक डॅनियल ही हार्ड ड्रिंक घेता यावी यासाठी मीहिरने आपल्या वयाबाबत दिशाभूल केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. मिहीर शहाने पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती सांगितली आहे. पोलिस त्याची कसून चौकशी करत आहे. मिहीरने याची कबुली दिली आहे की त्याने दारु प्यायली होती आणि गिरगाव चौपाटीजवळ कार चालवण्यासाठी त्याने ड्रायव्हकडून जबरदस्ती चावी घेतली.

दोन वेगवेगळ्या ठिकाणी दारु प्यायली

अपघाताच्या रात्री मिहीरने दोन वेगवेगळ्या ठिकाणी दारु प्यायली होती. मीहिरने गिरगाव चौपाटीजवळ कार चालवण्यासाठी ड्रायव्हरकडून जबरदस्ती गाडीची चावीही घेतली, असं पोलिसांनी सांगितलं. मिहीर शहा आणि त्याच्या मित्रांनी जुहू येथील बारमध्ये व्हिस्कीचे १२ लार्ज पेग प्यायले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली, त्यांचं बिलही समोर आलं आहे. यामध्ये हे दिसून येतं की त्यांनी व्हिस्कीचे १२ लार्ज पेग घेतले होत, एखाद्या व्यक्तीला ८ तासापर्यंत नशेत ठेवण्यासाठी हे पुरेसे आहेत.
Mumbai Hit And Run: मिहीर शहा प्रचंड प्यायला होता, पण…; पोलिसांच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती उघड
मिहीर हा रात्री दीड वाजताच्या सुमारास या बारमधून बाहेर येताना दिसला तर अवघ्या ४ तासात म्हणजेच पहाटे ५ वाजता हा अपघात झाला. ज्यामध्ये कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. उत्पादन शुल्क विभागाने जुहूच्या या बारचं लायसन्स रद्द केलं असून ते सील केलं आहे.

वय लपवल्याचा बारचा दावा

तसेच, त्याच्या मित्रांबाबतही माहिती घेण्यात आली आहे. शहाच्या तीन मित्रांचं वय हे ३० वर्षांपेक्षा जास्त आहे, पण रेकॉर्ड्सवरुन असं दिसून आलं की मिहीरचं वय हे २३ वर्ष आहे. बारने दावा केला आहे की मिहीरने त्याचं वय २७ असल्याचं सिद्ध करणारा आयडी दाखवला होता. सध्या पोलिस यबाबात तपास करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिहीर शहाला हार्ड ड्रिंक्स देण्यात आली होती. यामध्ये बारची काहीही चूक नाही. बारमधील एका कर्मचाऱ्याने दावा केला आहे की मिहीर शहासोबत आलेल्या सर्वांचे आयडी तपासण्यात आले होते, ज्यामध्ये बहुतांश लोकांचं वय ३० वर्षाच्या वर होतं.

मुंबई हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहाने हे मान्य केलं की अपघातावेळी तोच गाडी चालवत होता. मिहीरने गुन्हा कबुल करताना पश्चाताप व्यक्त केला आहे. त्याने म्हटलं की, माझ्याकडून चूक झाली. त्याने सांगितल्यानुसार त्याला माहिती नव्हतं की कावेरी या त्याच्या गाडीच्या बंपरमध्ये फसल्या आहेत. जर, त्याला याबाबतल जराही कल्पना असती तर त्याने गाडी पुढे नेली नसती. सध्या पोलीस त्याच्या जबाबाची तपासणी करत आहेत.