हिवाळ्यातही चेहऱ्यावर येईल ग्लो, खोबरेल तेलात मिसळा या गोष्टी

हिवाळ्यात चेहऱ्यावरील आर्द्रता कमी होऊ लागते. चेहऱ्यावरील आर्द्रता कमी झाल्याने चेहरा निस्तेज दिसू लागतो. हे अगदी सामान्य असून हिवाळ्यात यासाठी आपण मॉइश्चरायझर चा वापर करतो. पण सोबतच त्वचेची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्वचेची योग्य काळजी न घेतल्यास लालसरपणा आणि खाज येते. हे टाळण्यासाठी त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक असून त्यासाठी दिनचर्या ठरवली पाहिजे. यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने वापरतात.

घरामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या त्वचेला नैसर्गिक चमक आणण्यासाठी आणि त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. हिवाळ्यामध्ये अनेकांची त्वचा कोरडी होते ज्यांना ही समस्या असेल त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला खोबरेल तेल लावावे. तुम्ही खोबरेल तेलात आणखीन काही गोष्टी मिक्स करून त्याचा फेसपॅक बनवून देखील चेहऱ्याला लावू शकता.

खोबरेल तेल आणि मध

खोबरेल तेल आणि मध त्वचेसाठी आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. खोबरेल तेल त्वचेला हायड्रेट आणि मॉइश्चराईज करण्यासाठी मदत करते. तर मधामध्ये अँटिऑक्सिडंट असतात ज्यामुळे खराब झालेली त्वचा सुधारते आणि त्वचेवर चमक येते. एक चमचा खोबरेल तेलात एक चमचा मध मिसळून चेहऱ्याला पंधरा ते वीस मिनिटे लावून ठेवा आणि त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा.

खोबरेल तेल आणि कोरफड

कोरफड चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कोरफड फक्त चेहरा हायड्रेट करण्यास मदत करत नाही तर त्या सोबतच त्वचा हिवाळ्यात ओढली जाते ती कमी करण्यास देखील कोरफड फायदेशीर ठरते. खोबरेल तेल आणि मध त्वचेचा कोरडेपणा दूर करतात आणि त्वचेला आर्द्रता देण्याचे काम करतात. एक चमचा कोरफडीचा गर आणि एक चमचा खोबरेल तेल एका भांड्यात घेऊन चांगले मिक्स करा. त्यानंतर हे तुमच्या त्वचेवर लावा आणि ते 20 ते 30 मिनिटानंतर चेहरा धुवा.

खोबरेल तेल आणि व्हिटॅमिन ई कैप्सूल

व्हिटॅमिन ई कैप्सूल आणि खोबरेल तेल एकत्र करून चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावर चमक येण्यासोबतच चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी होतात. व्हिटॅमिन ई मुळे त्वचा गुळगुळीत आणि मुलायम होते. खोबरेल तेल आणि व्हिटॅमिन ई एकत्र लावल्यास खराब झालेली त्वचा सुधारते आणि यामुळे त्वचेला मॉइश्चरायझर मिळते. तुम्ही खोबरेल तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल एकत्र मिक्स करून चेहऱ्याला लावू शकता. त्वचेवर हलक्या हाताने मसाज करा आणि 15 ते 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)