मध्य रेल्वेने 2024 – 25 या आर्थिक वर्षात चित्रपट चित्रीकरणाच्या भाड्याच्या माध्यमातून 40 लाख 13 हजार रुपये महसूल मिळविला आहे
आपटा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ही स्थानके चित्रपट निर्मात्यांची सर्वांत आवडती चित्रीकरणस्थळे आहेत
मध्य रेल्वेने चित्रीकरणासाठी विविध परिसर आणि रेल्वे कोच देऊन 40 लाख 13 हजार रुपयांहून अधिक महसूल मिळवला आहे
चित्रपट निर्माते आणि आघाडीच्या निर्मिती संस्थांनी 3 चित्रपट, 2 वेब सिरीज, 1 प्रादेशिक चित्रपट आणि 1 जाहिरातपट यांचे चित्रीकरण केले.
एका नामांकित प्रोडक्शनच्या ‘गांधारी’ चित्रपटाच्या चित्रीकरणातून सर्वाधिक 17.85 लाख रुपये रेल्वेला मिळाले. त्यानंतर ‘आप जैसा कोई’ चित्रपटाच्या चित्रीकरणातून 8.12 लाख रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळाले…