Mayonnaise for Hair Growth, Benefits & How to UseImage Credit source: tv9 marathi
चीजप्रमाणे मेयोनीजही सर्वांना आवर्जून आवडतं. पण तुम्हाला माहितीये का की मेयोनीज हे चक्क आपल्या केसांच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठीही चांगलं असतं. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण मेयोनीज खाल्ल्याने तुमचे केस मऊ, चमकदार आणि जाड होऊ शकतात तसेच अनेक फायदे यामुळे मिळू शकतात. हा एक स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे, ज्याचे परिणाम दोन-तीन प्रयत्नांमध्ये दिसून येतात. या मेयोनीजमुळे कोणते फायदे होताता ते जाणून घेऊयात.
केसांसाठी मेयोनीजचे फायदे
केस लांब आणि जाड करा
मेयोनीजमध्ये अंडी, व्हिनेगर आणि तेल असते, जे केसांना खोल पोषण देते. त्यात असलेले अमिनो आम्ल केसांची वाढ करण्यास मदत करते, तर अंड्यामध्ये असलेले प्रथिने केसांना जाड, चमकदार आणि मजबूत बनवतात.
कोंड्याची समस्या दूर होते
जर तुम्हाला कोंड्याची समस्या असेल तर मेयोनीज हा एक उत्तम उपाय असू शकतो. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स टाळूला हानिकारक बॅक्टेरियापासून दूर ठेवतात, ज्यामुळे केस मॉइश्चरायझ राहतात आणि कोरड्या स्कॅल्पची समस्या दूर होते. जेव्हा स्कॅल्प निरोगी असेल तेव्हा कोंड्याची समस्या राहणार नाही.
केसांची चमक वाढते
मेयोनीजमध्ये असलेले तेल आणि अंडी केसांना खोलवर मॉइश्चरायझ करतात, ज्यामुळे ते निरोगी आणि चमकदार दिसतात. हे एक उत्कृष्ट नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते, ज्यामुळे केस सिल्की होतात.
तुम्ही मेयोनीज खाण्यासोबतच केसांना लावूही शकता. जाणून घेऊयात की मेयोनीजचा वापर कसा करायचा ते?
प्रथम, तुमचे केस थोडेसे ओले करा आणि ते चांगले विंचरुन घ्या. आता केसांच्या लांबीवर कंडिशनरप्रमाणे मेयोनीज ?लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. मेयोनीज केसांवर 20 मिनिटे राहू द्या आणि नंतर शॅम्पूने केस धुवा. पहिल्या वापरापासूनच तुमचे केस मऊ आणि चमकदार दिसू लागतील.