Hindu Boy Married Muslim Girl: राज्यात एक आंतरधर्मीय लग्न झाले आहे. या लग्नात एका हिंदू मुलाने मुस्लीम मुलीसोबत लग्न केले आहे. त्यानंतर त्या दोघांना परिवाराकडून धमक्या मिळू लागला. यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर उच्च न्यायालयाने दोघांना ‘सेफ होम्स’ मध्ये पाठवण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठने यांनी हे आदेश दिले. महाराष्ट्रात दुसऱ्या धर्मात विवाह करणाऱ्या दाम्पत्यासाठी सेफ होम्स बनवले आहे.
याचिकेत सुरक्षेची मागणी
23 वर्षीय हिंदू मुलाने मुस्लीम युवतीसोबत लग्न केले. दोघे मुंबईतील मीरा रोड भागांत राहतात. त्यांच्या परिवाराने दोघांचे लग्न स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यानंतर दोघांना परिवाराकडून धमक्या मिळू लागल्या. त्यांनी आपल्या परिवाराकडून असलेल्या धोका लक्षात घेऊन सुरक्षेची मागणी केली. याचिकेत म्हटले आहे की, मुलगा आणि मुलीने स्पेशल मॅरिज एक्टनुसार लग्न केले आहे. त्याची माहिती सब-रजिस्ट्रार ऑफिसमध्ये दिली. त्यांचे वकील मिहिर देसाई आणि लारा जेसानी यांनी कोर्टात सांगितले की, याचिकाकर्त्यांचा परिवार त्यांच्या या लग्नाच्या विरोधात आहे.
न्यायालयाने दिले आदेश
दाम्पत्याने परिवारापासून धोका असल्याचे सांगत मुंबईत एका सुरक्षित घराची मागणी केली. तसेच मुलाने पोलीस संरक्षण मागितले. कारण तो 23 डिसेंबरपासून कार्यालयात रुजू होणार आहे. त्यांनी मीरा रोड पोलीस ठाणे आणि ठाणे पोलीस आयुक्तांकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. 18 डिसेंबर रोजी महाराष्ट्र सरकारने 44 सुरक्षित घरांची यादी जाहीर केली. एडिश्नल पब्लिक प्रोसिक्यूटर प्राजक्ता शिंदे या दाम्पत्यास कोर्टाच्या आदेशानंतर सुरक्षित घरात दाखल करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी एक पोलीस गार्ड असणार आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयाने पोलीस ठाण्यास अतिरिक्त सुरक्षा गार्ड देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ठाणे पोलीस आयुक्तांनी 48 तासांत त्यांच्या सुरक्षेचा अर्जावर निर्णय घ्यावा, असेही निर्देश कोर्टाने दिले आहे.