मेधा पाटकर अडचणीत; मानहानीच्या खटल्यात ठरल्या दोषी, २४ वर्षांपूर्वी नेमकं काय घडलेलं?
मानहानीच्या प्रकरणात तक्रार दाखल केल्यानंतर २३ वर्षांनंतर दिल्लीच्या साकेत न्यायालयाने नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना शुक्रवारी दोषी ठरवले. विद्यमान नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. ‘प्रतिष्ठा ही सर्वांत मौल्यवान संपत्ती आहे आणि एखाद्याच्या प्रतिष्ठेवर त्याचा परिणाम होतो,’ असे न्यायालयाने म्हटले आहे.