नाशिकमधील कॅफेवर आमदार देवयानी फरांदे पोहचल्या.Image Credit source: TV 9 Marathi
नाशिकसारख्या सांस्कृतिक शहरात अनेक धक्कादायक प्रकार सुरु आहेत. कॅफेच्या माध्यमातून तरुण-तरुणींना गैरप्रकार करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली जात आहे. यासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून शहरात चर्चा सुरु होती. परंतु पोलिसांकडून कुठे कारवाई केली जात नव्हती. अखेर या प्रकरणाची माहिती भारतीय जनता पक्षाच्या आमदार देवयानी फरांदे यांच्यापर्यंत गेली. त्यानंतर त्यांनी स्वतः छापा टाकला. त्यावेळी कॅफेमध्ये सुरु असलेले प्रकार पाहून त्यांना धक्का बसला. आमदार पोहचल्याचे कळताच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी अनेक तरुण-तरुणींना ताब्यात घेतले.
अनेक मुले-मुली ताब्यात
राज्यातील अनेक शहरांमध्ये कॅफे उघडून त्या ठिकाणी मुला-मुलींना प्रवेश दिला जातो. कॅफेमध्ये तासांनुसार दर घेतले जातात. अंधार करुन पडदे लावले जातात. राज्यातील पोलीस यंत्रणेस हे सर्व प्रकार माहीत असतात. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते. नाशिकमध्ये ‘अ’मोगली कॅफेत गैरप्रकार सुरु असल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी स्वत: त्या ठिकाणी जावून छापा टाकाला. त्यावेळी तरुण मुला मुलींना 100 ते 200 रुपयांत रूम दिले जात असल्याची धक्कादायक माहिती त्यांना मिळाली. आमदार फरांदे त्या ठिकाणी पोहचल्यावर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलिसांनी कॅफेमध्ये अनेक मुला मुलींना अश्लील चाळे करताना ताब्यात घेतले.
दरम्यान, ‘अ’मोगली कॅफेत सुरु असलेल्या प्रकारामुळे नाशिकसारख्या सांस्कृतिक शहरात काय सुरु आहे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. पोलिसांनी अशा कॅफेचालकांवर वेळीच कारवाई केली असती तर लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी जाण्याची गरज पडली नसती. आता पोलीस त्या मुला-मुलींच्या पालकांना बोलवून समज देणार आहे.