Mansoon Update In Mumbai : अखेर..! मान्सूनची प्रतीक्षा संपली, ‘या’ दिवशी मान्सून मुंबईत धडकणार

मुंबई : सध्या देशासह राज्यभरातील शेतकरी वरुणराजाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचबरोबर मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये पाण्यासंदर्भात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आता भारतीय हवामान विभागाने मान्सून बद्दल दिलासा देणारी बातमी दिली आहे.येत्या तीन ते चार दिवसांत मान्सून मुंबईत दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून हा महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि दक्षिण छत्तीसगडमधील काही भागामध्ये मान्सून येत्या तीन ते चार दिवसांमध्ये म्हणजेच १० जूनपर्यंत दाखल होणार आहे.

मान्सून पुढे सरकला

आयएमडीचे महासंचालक एम महापात्रा यांनी या बाबतची अधिक माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “पुढील आठवड्यात मान्सून उत्तर सीमा मध्य भारताच्या काही भागात पोहोचेल, त्यामुळे उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता कमी आहे.” दरम्यान, मान्सून मध्य अरबी समुद्राच्या काही भागासह, कर्नाटकातील बहुतांश भाग तसेच महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील काही भागांमध्ये पुढे सरकला आहे.
पंकजांना पाडून जाएंट किलर ठरलेल्या बजरंग बाप्पांचं प्रमोशन? थेट पवारांशेजारची खुर्ची मिळाली!

पूर्व भारत, उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेची लाट निर्माण होणार

वायव्य भारतात शुक्रवार पर्यंत पाऊस आणि ढगांचा गडगडाट सुरू राहण्याची शक्यता आहे. तर पूर्व भारत, उत्तर प्रदेश आणि उत्तर मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट निर्माण होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काल दक्षिण उत्तर प्रदेश, दिल्ली आणि हरियाणा, उत्तर मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थानच्या काही भागात उष्णतेची लाट दिसून आली आहे.

मुंबईसह राज्यभरात पाणी टंचाई

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव व धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्यामुळे मुंबईत सध्या ५ टक्के आणि १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्यात असलेल्या बहुतांश धरणांनी तळ गाठला आहे. यामुळे जलसंकट अधिक गडद झाले आहे. मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईने भीषण रूप धारण