उन्हाळ्यात आइस फेशियलसाठी कोरफडीपासून ते ग्रीन टी पर्यंत करा ‘हे’ घरगुती उपाय

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेची अधि‍कतर काळजी घ्यावी लागते. वातावरणातील गरम हवेमुळे त्वचेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशातच तुम्ही उन्हाळ्यांच्या दिवसांमध्ये आईस फेशियल किंवा स्किन आयसिंग केल्यास हे केवळ तुमच्या त्वचेची काळजी घेत नाही तर त्याचे अनेक फायदे देखील देते. विशेष म्हणजे ते कधीही करता येते. या पद्धतीत, चेहऱ्यावर बर्फ चोळावा लागतो किंवा चेहरा बर्फाच्या पाण्यात बुडवावा लागतो. याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नसला तरी, असे म्हटले जाते की ते मुरुम कमी करते, त्वचेचा रंग सुधारते, डोळ्यांची सूज दूर करते. आईस फेशियल करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा किंवा त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा जेणेकरून ही पद्धत तुमच्यासाठी प्रभावी ठरेल की नाही हे निश्चित करता येईल.

बरं आईस फेशियल ट्रेंडमध्ये आहे कारण ते पैसे खर्च न करता घरी सहज करता येते. ही पद्धत त्वचेला हायड्रेट करते आणि छिद्रे देखील घट्ट करते. घरी तुम्ही कोणत्या प्रकारे आइस फेशियल करू शकता ते आपण आजच्या या लेखातून जाणून घेऊयात…

चेहऱ्यावर बर्फ कसा लावायचा?

जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर थेट बर्फ चोळायचा असेल तर एका सुती कापडात बर्फाचा तुकडा घ्या आणि काही वेळ त्वचेवर हलक्या हाताने चोळा. असे केल्याने उन्हाळ्यात त्वचेचे हायड्रेशन वाढेलच, शिवाय तुम्हाला घट्टपणाचाही फायदा मिळेल. लक्षात ठेवा की तुम्हाला हे 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ करायचे नाही.

आइस फेशियल करण्याचे वेगवेगळे पद्धत

कोरफडीचे आइस क्यूब्स

कोरफडीमध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म तुमच्या त्वचेतील सूज आणि जळजळ कमी करतात. त्याचे थंड गुणधर्म लालसरपणा, जळजळ, टॅनिंग आणि ॲलर्जी कमी करण्यास मदत करतात. त्यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मुरुम आणि डाग कमी करण्यास मदत करतात. कोरफड त्वचेला हायड्रेट करते, आणि त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझेशन ठेवते. कोरफडीचे बर्फाचे तुकडे बनवण्यासाठी, कोरफड जेल पाण्यात मिसळा आणि ते बर्फाच्या ट्रेमध्ये गोठवा. यानंतर हे चौकोनी तुकडे चेहऱ्यावर लावा.

ग्रीन टीचे आइस क्यूब्स

ग्रीन टी त्वचेला अँटीऑक्सिडंट्स प्रदान करते आणि जळजळ कमी करते. तसेच हे मुरुमे कमी करण्यास मदत करते, त्वचा उजळवते आणि त्वचेचा रंग सुधारते. याव्यतिरिक्त, ग्रीन टी त्वचेला हायड्रेट करते आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी ते एक्सफोलिएट करते. यासोबतच ग्रीन टी कोलेजनचे उत्पादन वाढवते आणि छिद्रे घट्ट करते. ग्रीन टीचे आइस क्यूब्स बनवण्यासाठी ग्रीन टी उकळवा आणि थंड करा, नंतर ती बर्फाच्या ट्रेमध्ये गोठवा. गोठल्यानंतर, हे बर्फाचे तुकडे चेहऱ्यावर लावा.

काकडी आणि लिंबूचे आइस क्यूब्स

काकडीत 95 % पाणी असते, जे त्वचेला हायड्रेट करण्यास मदत करते. काकडीत थंडावा देणारे गुणधर्म असतात, जे त्वचेची जळजळ कमी करण्यास मदत करतात. त्याचवेळी, लिंबू त्वचेला ताजेतवाने आणि चमकदार बनवते. कारण लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे त्वचेवरील डाग आणि पिगमेंटेशनची समस्या कमी करण्यास मदत करते. काकडी आणि लिंबू दोन्हीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचा निरोगी ठेवण्यास आणि त्वचेची पीएच पातळी राखण्यास मदत करतात. काकडी आणि लिंबूचे आइस क्यूब्स बनवण्यासाठी, काकडी आणि लिंबाचा रस एकत्र करा आणि ते एका बर्फाच्या ट्रेमध्ये ओता आणि ते गोठू द्या. यानंतर, हे बर्फाचे तुकडे चेहऱ्यावर लावा.

दूध आणि मधाचे आइस क्यूब्स

दूध आणि मध त्वचेला मऊ आणि मॉइश्चरायझ ठेवण्यासह त्वचेला पोषण देतात, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार राहते. मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे मुरुम आणि डाग कमी करण्यास मदत करतात. तसेच दुधामध्ये लॅक्टिक अॅसिड असते, जे त्वचेला एक्सफोलिएट करते आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते. याशिवाय, दुधात असलेले जीवनसत्त्वे आणि वृद्धत्वविरोधी गुणधर्म त्वचेवर वयाचा परिणाम दाखवत नाहीत. दूध आणि मधाचे आइस क्यूब्स बनवण्यासाठी, दूध आणि मध चांगले मिक्स करून घ्या. ते एका बर्फाच्या ट्रेमध्ये ओता आणि फ्रीजरमध्ये गोठवा. यानंतर, हे बर्फाचे तुकडे चेहऱ्यावर लावा.

अशाप्रकारे हे घरगुती उपाय करून तुम्ही उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेऊ शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)