मेकअप किटImage Credit source: टीव्ही9 भारतवर्ष
कोणताही कार्यक्रम असो प्रत्येक मुली व महिला मेकअप करतातच. मेकअपमुळे सौंदर्य वाढण्यासोबतच आत्मविश्वास देखील वाढतोच. पण त्याचसोबत त्वचेची काळजी घेताना आपण मेकअप केल्यानंतर काढून टाकणे देखील फार महत्वाचे आहे. जर तुम्ही मेकअप काढण्याचा कंटाळा केला तर याने तुमच्या चेहऱ्यावर दुष्परिणाम दिसून येतात. त्यामुळे वेळीच योग्य ती खबरदारी घ्यावी लागते. चेहऱ्यावरील मेकअप काढून टाकण्याची खबरदारी आपण घेतली पण तुमच्या या मेकअप किटमधून जुन्या गोष्टी देखील काढाव्यात. कारण जुन्या आणि ज्या मेकअप प्रॉडक्टची एक्सपायरी डेट संपली असेल तर त्या प्रॉडक्टचा वापर करू नका. कारण या गोष्टी तुमच्या त्वचेला नुकसान पोहचवू शकतात.
तुम्ही जर तुमच्या मेकअप किटमध्ये जुन्या वस्तू वापरत असाल तर त्यांचा कालांतराने तुमच्या त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. या लेखात आम्ही तुम्हाला अशा मेकअप प्रॉडक्ट बद्दल सांगणार आहोत जे जुने झाल्यावर तुमच्या मेकअप किटमधून ताबडतोब काढून टाकावेत.
ड्राय मस्कारा
मेकअप करताना डोळयांचे सौंदर्य व डोळे आकर्षक दिसण्सासाठी मस्कारा वापरला जातो. पण तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की, मस्करा या प्रॉडक्टचे लाइफ खूपच कमी असते. साधारणपणे 3 ते 6 महिन्यांनी ते बदलावे. जुन्या झालेल्या किंवा कोरड्या मस्करामुळे डोळ्यांची जळजळ, लालसरपणा किंवा संसर्ग यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
फाऊंडेशन
मेकअप करताना त्वचेवरील पुरळ तसेच काळे गडद डाग लपवण्यासाठी फाऊंडेशन लावले जाते. त्याचबरोबर त्वचेचा रंग एकसारखा करण्यासाठी फाऊंडेशनचा वापर केला जातो. पण जेव्हा फाऊंडेशन जुने होते तेव्हा त्याचा रंग बदलू शकतो. जर फाऊंडेशनचा रंग बदलेला असेल तर तुमच्या मेकअप किटमधून ताबडतोब फाऊंडेशन काढून टाका. एक्सपायर झालेल्या फाऊंडेशनमध्ये त्वचेच्या समस्या निर्माण करणारे बॅक्टेरिया असू शकतात.
तुमची लिपस्टिक बदला
बऱ्याचदा काही महिला लिपस्टिकचा एक विशिष्ट शेड बराच काळ वापरत असतात. त्यातच लिपस्टिक बराचकाळ ठेवता येत नाही. कारण लिपस्टिकची सुद्धा एक्सपायर डेट असते. त्यामुळे लिपस्टिक खूप काळ वापरली तर त्यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशी निर्माण होऊ शकतात. यामुळे जुनी झालेली व एक्सपायर लिपस्टिक ओठांवर लावल्याने ॲलर्जी होऊ शकते.
मेकअप ब्रशेस
मेकअप ब्रशेस आणि स्पंज नियमितपणे स्वच्छ करावेत. हे ब्रश आणि स्पंज आपल्या चेहऱ्याच्या त्वचेच्या थेट संपर्कात येतात, ज्यामुळे बॅक्टेरिया जमा होऊ शकतात. जर हे ब्रश आणि स्पंज खराब किंवा जुने झाले तर ते त्वचेवर रिॲक्शन येऊ शकतात. अशा परिस्थितीत मेकअप ब्रशेस आणि स्पंज यांचा बराच काळ वापर टाळावा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)