प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली पाहिजे, कारण पाहिलं सुख निरोगी शरीर आहे. वाढत्या वयात हे अधिकच महत्त्वाचे ठरते, कारण एका वयानंतर शरीर कमकुवत होऊ लागते आणि वयाशी संबंधित आजार वाढू लागतात. वयाची ६० वर्षे हा आरोग्यापासून इतर दृष्टीकोनातून कोणाच्याही आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. या वयात जिथे निरोगी राहण्याचे आव्हान वाढते, तिथे माणूस स्वत:साठीही आपले आयुष्य जगण्यासाठी स्वत:ला तयार करू शकतो. यासाठी फिट असणं खूप गरजेचं आहे आणि हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा जीवनशैलीत काही आवश्यक बदल केले जातील.
वयाच्या ६०व्या वर्षी आरोग्याच्या समस्येमुळे बहुतेक लोकं खूप अस्वस्थ होतात, तर काही लोकं असे असतात जे या वयातही निरोगी आणि आनंदी आयुष्य जगतात. त्यासाठी जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया
तणावापासून दूर राहणे गरजेचे आहे
वाढत्या वयोमानानुसार स्वत:ला मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा शारीरिक आरोग्यावरही परिणाम होऊ लागतो, त्यामुळे तणावापासून दूर राहणे गरजेचे आहे आणि दररोज मेडिटेशन करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात किंवा शांत ठिकाणी जाऊन काही वेळ मेडिटेशन करणे. याशिवाय बागकामासारख्या आपल्या आवडत्या छंदाला ही वेळ देऊ शकता.
पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे
झोपेची कमतरता अनेकदा वृद्धांमध्ये दिसून येते. हि कमतरता टाळणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी रोज रात्री झोपताना एक कप कोमट दूध घेऊन त्यात जायफळ किंवा हळद मिक्स करून त्याचे सेवन करा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते आणि हाडे मजबूत होतात आणि सांधे आणि स्नायूदुखणे टाळता येते. मेडिटेशनमुळे मन शांत होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.
शारीरिक आक्टिव्हिटी करत राहणे
वाढत्या वयात स्नायू कमकुवत होऊ लागतात आणि त्यामुळे इजा होण्याचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी ६० वर्षे वयोगटातील लोकांनी चालणे, सायकल चालविणे, पोहणे इत्यादी दैनंदिन एरोबिक व्यायाम सुरू ठेवावे. याशिवाय शरीराचा समतोल योग्य ठेवायचा असेल तर एका पायावर उभे राहणे, पायाच्या बोटांवर थोडा वेळ चालणे अशा क्रिया करायला हव्यात. ज्याने तुम्ही निरोगी राहू शकाल.
आहाराकडे लक्ष देणे सर्वात महत्वाचे आहे
वयाच्या ६०व्या वर्षी निरोगी राहण्यासाठी आहाराकडे लक्ष देणं सर्वात गरजेचं आहे. तुमच्या आहारातून साखर आणि मीठ थोडे कमी करा आणि हिरव्या भाज्यांपासून हंगामी फळे, शेंगदाणे, नटस, धान्य यांचा आहारात समावेश करा. फायबर, प्रथिने आणि कॅल्शियमयुक्त पदार्थांचं सेवन करा, कारण वयानंतर स्नायू आणि हाडे मजबूत ठेवणे एक आव्हान असते. त्याचबरोबर भरपूर पाणी पित राहिले पाहिजे.
नियमित आरोग्य तपासणी करून घ्या
वयाच्या ६०व्या वर्षी आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करता कामा नये. दर ६ महिन्यांनी संपूर्ण बॉडी चेकअप (कोलेस्टेरॉलची पातळी, रक्तातील साखर, हृदय तपासणी) करून घेण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय कोणतीही असामान्य लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.