उन्हाळ्यात रिफ्रेशिंगसाठी वेगवेगळ्या राज्यांचे ‘हे’ 7 प्रसिद्ध पेय बनवा घरीच, जाणून घ्या रेसिपी

उन्हाळ्याच्या दिवसात कडक उष्णतेचा सामना करावा लागतो. तर या वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी शरीराला हायड्रेटेड ठेवणे आवश्यक असते. यासाठी फक्त पाणी पिणे पुरेसे नाही ती हेल्दी ड्रिंक्स पिणे देखील महत्वाचे आहे. कारण हेल्दी ड्रिंक्सच्या सेवनाने त्यात वापरले जाणारे पदार्थ शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यास मदत करतात. उन्हाळ्यात ताजेतवाने वाटण्यासाठी बाजारात मिळणारे थंड पेय म्हणजेच कॉल्डड्रिंक्स पिणे टाळावे. कार्बोनेटेड पाण्यापासून बनवलेले पेय शरीराला डिहायड्रेट करतात, तर घरी बनवलेल्या सरबतमध्ये अनेक नैसर्गिक घटक वापरले जातात, जे शरीराला पोषक तत्वे देखील प्रदान करतात. आपल्या देशात प्रत्येक राज्यांमध्ये जेवण बनवण्याची वेगळी असते आणि पारंपारिक पदार्थांची चव अनोखी असते. उन्हाळ्यात ताजेतवाने होण्यासाठी, तुम्ही वेगवेगळ्या राज्यांतील काही सरबतं बनवून तुमच्या आहारात समावेश करू शकतात. .

तीव्र सूर्यप्रकाश आणि आर्द्रतेमुळे आरोग्याची परिस्थिती दयनीय बनते. अशावेळेस एक चविष्ट-आरोग्यदायी पेय केवळ शरीराला हायड्रेट करत नाही तर ऊर्जा देखील वाढवते. वेगवेगळ्या राज्यांमध्ये बनवल्या जाणाऱ्या काही सरबतांच्या पाककृती आपण आजच्या या लेखातुन जाणून घेऊया.

राजस्थानमधील आंबट-तिखट चिंचेचे पेय

राजस्थानमध्ये तीव्र उष्णता जाणवते. येथे ‘इमली का आमलाना’ हे थंडगार पेय उन्हाळ्यात पिण्यास म्हणून दिले जाते. हे सरबत बनवण्यासाठी चिंच आधी पाण्यात भिजत ठेवा. कमीत कमी 2 ते 2.5 तासांनी चिंच चांगले मॅश करा आणि नंतर पाणी गाळून घ्या. या पाण्यात साखर, काळे मीठ, काळी मिरी घाला आणि नंतर पुदिन्याची पाने थोडीशी कुस्करून त्यात मिसळा. हे सरबत थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर सर्व्ह करा किंवा बर्फाचे तुकडे घालून लगेच सर्व्ह करू शकता.

बिहारचा मसालेदार सत्तू सरबत

सत्तूपासून अनेक पदार्थ बनवले जातात आणि बिहारचा सत्तू सरबत देशभर प्रसिद्ध आहे. तर हे सरबत बनवण्यासाठी सत्तू पाण्यात मिसळा. त्यात लिंबू, काळे मीठ, काळी मिरी आणि चिरलेला हिरवा कांदा टाकुन तुमचा मसालेदार सत्तू सरबत तयार होईल.

पंजाबची लस्सी

उन्हाळ्यात पंजाबची लस्सी प्यायलात तर तुम्हाला एकदम फ्रेश वाटते. तसेच पंजाबच्या लस्सीचे तुम्हाला स्टॉल देशभरात आढळतील. पंजाबची लस्सी बनवण्यासाठी दही इतके मळले जाते की ते खूप मलाईदार बनते. यानंतर, चवीनुसार साखर टाकली जाते आणि वर ड्रायफ्रुट्स आणि क्रीम टाकले जाते आणि नंतर सर्व्ह केले जाते.

दक्षिण भारतातील पिन्नक्कम

दक्षिण भारत त्याच्या समृद्ध पदार्थांसाठी देखील ओळखला जातो. दक्षिण भारतात उन्हाळ्याच्या दिवसात पिनाक्कम सरबत खास करून बनवले जाते. हे सरबत बनवण्यासाठी गुळाचे छोटे तुकडे करा आणि नंतर वेलची आणि काळी मिरी नीट बारीक करा. या सर्व गोष्टी पाण्यात टाका आणि मिसळा आणि नंतर पाणी गाळून घ्या. त्यात आले पावडर, तुळशीची पाने आणि लिंबाचा रस घाला. त्याची चव वाढवण्यासाठी, चिमूटभर खाण्यायोग्य कापूर पूड मिक्स करा. हे पेय प्यायल्याने तुम्हाला ताजेतवाने वाटते तसेच तुमचे शरीर हायड्रेट करते आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते.

उत्तर प्रदेशातील बेलफळाचे सरबत

बेलफळाचे सरबत प्रत्येक ऋतूत फायदेशीर असतो, परंतु उन्हाळ्यात याच सरबताचे सेवन केल्यास शरीर आतुन थंड राहते आणि वाढत्या तापमानात उष्णतेपासून संरक्षण करते. या सरबताच्या सेवनाने पचनाच्या समस्या देखील टाळता येतात. बेलफळाचे सरबत बनवण्यासाठी या फळांचा गर काढून घ्या. आता एका ग्लासमध्ये थोडे पाणी किंवा बर्फाचे तुकडे मिक्स करा. व त्यात बेलफळांचा काढलेला गर मिक्स करा. गोडवा येण्यासाठी थोडा गूळ टाका आणि तुमचा बेलफळाचे सरबत पिण्यास तयार आहे.

महाराष्ट्रातील कोकम सरबत

उन्हाळ्यात कोकम सरबत नक्की ट्राय करा. कारण कोकम सरबत प्यायल्याने तुम्हाला हायड्रेटेड ठेवते आणि शरीराला अनेक पोषक तत्वे देखील प्रदान करते. कोकम फळ धुतल्यानंतर, त्याच्या बिया वेगळ्या करा आणि नंतर ते बारीक करा. आता एका भांड्यात साखर किंवा साखरेच्या पाकयात मिक्स करून त्यात कोकमाचा गर मिक्स करा आणि जिरेपूडसह वेलचीपूड टाका. आता हे तयार केलेले मिश्रण तुम्ही फ्रीजरमध्ये ठेऊ शकता आणि गरज पडल्यास एका ग्लासमध्ये दोन किंवा तीन चमचे तयार कोकमाचे मिश्रण टाकुन त्यात थंड पाणी घाला आणि कोकम सरबताचा आस्वाद घ्या.

बंगालचे आंब्याचे पन्ह

उन्हाळ्यात आंब्याचे पन्ह खूप पिले जाते. कारण हे देशभरातील एक आवडते पेय आहे. यासाठी प्रथम कच्चा आंबा भाजून घ्या आणि नंतर त्याचातील गर काढून घ्या. यानंतर यात काळे मीठ, भाजलेले जिरे, काळी मिरी पावडर टाकुल मिश्रण मिक्स करा. हे सरबत गोड आणि आंबट करण्यासाठी तुम्ही साखर देखील मिक्स करू शकता. हे मिश्रण थंड पाण्यात मिसळा आणि ताज्या कोथिंबीरच्या पानांनी सजवून आंब्याचे पन्ह पिण्यास तयार आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)