फक्त ‘या’ दोन गोष्टींपासून बनवा होममेड काजळ, डोळ्यांना मिळतील फायदे

आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल जीवनशैलीत, तासंतास मोबाईल आणि लॅपटॉप तसेच संगणकाच्या स्क्रीनसमोर बसून राहणे, प्रदूषण, धूळ आणि झोपेचा अभाव यांचा आपल्या डोळ्यांवर सर्वाधिक परिणाम होतो. त्यामुळे डोळ्यांची योग्य काळजी घेणे खूप महत्वाचे असते. डोळ्यांच्या संरक्षणासाठी आणि सौंदर्यासाठी प्राचीन काळापासून एक खास घरगुती उपाय वापरला जात आहे, तो म्हणजे नैसर्गिक काजळ.

तर हे नैसर्गिक काजळ केवळ डोळ्यांचे सौंदर्य वाढवत नाही तर डोळ्यांसाठी एक नैसर्गिक औषध देखील आहे. विशेषतः जेव्हा हे काजळ तुम्ही शुद्ध घरगुती तूप आणि बदाम यापासून बनवले जाते. हे डोळ्यांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. बदाम डोळ्यांना आवश्यक पोषण देतात, तर तूप थंडावा आणि आराम देते. या दोघांचे मिश्रण दृष्टी सुधारण्यासाठी, जळजळ कमी करण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे. ते घरी कसे बनवायचे आणि त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया.

बदाम आणि तूप यापासून असे बनवा नैसर्गिक काजळ

सर्वप्रथम एका दिव्यात थोडे तूप भरा आणि त्यात कापसाची वात लावा. आता बदाम एका स्वच्छ काट्यात किंवा काठीत अडकवा आणि ते जळत्या दिव्याच्या ज्वाळेवर भाजा. जेव्हा बदाम पूर्णपणे काळे पडल्यानंतर त्यामधुन धुर येईल. तेव्हा जळत्या दिव्यावर एक स्टील प्लेट उलटी ठेवा जेणेकरून बदामाचा काळेपणा (धूर) जमा होईल. त्यानंतर त्या प्लेटवर जमा झालेल्या काळ्या पावडरला एका पेपरच्या मदतीने छोट्या भांड्यामध्ये जमा करा. त्यानंतर या पावडरमध्ये थोडेस तुप मिक्स करा, जेव्हा हे मिश्रण थंड होईल तेव्हा या मिश्रणाचा उपयोग तुम्ही काजळ म्हणून करू शकता.

डोळ्यांना हे फायदे देतात

घरगुती तुपामध्ये थंडावा असतो, ज्यामुळे उन्हाळ्यात डोळे थंड राहतात आणि जळजळ किंवा खाज कमी होते.

बदामामध्ये असलेले व्हिटॅमिन ई आणि तुपात असलेले पोषक तत्व डोळ्यांच्या स्नायूंना बळकटी देतात, ज्यामुळे दृष्टी सुधारते.

काजळ डोळ्यांच्या कडांवर एका थरासारखे काम करते, जे धूळ आणि ॲलर्जीन थेट डोळ्यांत जाण्यापासून रोखते.

जास्त वेळ पडद्यावर काम केल्याने डोळे थकतात. हे देसी काजल डोळ्यांना आराम देण्यास मदत करते.

या काजळात असलेले अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांभोवतीच्या त्वचेला पोषण देतात आणि काळी वर्तुळे हलकी करण्यास मदत करतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)