बदाम आपल्या आरोग्यासाठी सुपरफूड मानले जाते हे सगळ्यांनाच माहित आहे. बदामाचे सेवन केवळ तुमच्या शरीराला ऊर्जा देत नाही तर तुमच्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. प्रत्येकजण बदामाचे सेवन सालांसह आणि सालांशिवाय करत असतात. अनेकदा आपण रात्रभर बदाम पाण्यात भिजवून ठेवतो, त्यानंतर दुसऱ्यादिवशी सकाळी उठून बदाम सोलून त्याचे सेवन करत असतो. त्यानंतर बदामाच्या साली फेकून देतो. पण तुम्हाला माहित आहे का की बदामाच्या सालीचा उपयोग तुमच्या त्वचेसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. बदामाप्रमाणेच याच्या सालीमध्ये अनेक नैसर्गिक घटक असतात जे त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात.
बदामातील अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे तुमची त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात. जर तुम्हाला तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये नैसर्गिक गोष्टींचा समावेश करायचा असेल तर बदामाच्या सालीच्या मदतीने तुम्ही चेहऱ्याचा रंग कसा सुधारू शकता हे आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत.
बदामाच्या सालीचे फायदे
1. त्वचेला खोलवर स्वच्छ करा
तुम्ही तुमच्या स्किनकेअर रुटिंग मध्ये बदामाची साल स्क्रब म्हणून वापरू शकता. हे त्वचेला खोलवर स्वच्छ करते आणि त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते, त्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि चमकदार दिसते.
2. पिग्मेंटेशन आणि त्वचेवरील गडद डाग कमी होतात
जर तुम्हाला पिग्मेंटेशन आणि डार्क स्पॉट्सचा त्रास होत असेल तर तुम्ही बदामाच्या सालीचा वापर तुमच्या स्किन केअर रुटिंगमध्ये करा. बदामाच्या सालीत असलेले अँटीऑक्सिडंट्स काळे डाग आणि पिग्मेंटेशन कमी करण्यास मदत करतात. यामुळे तुमच्या त्वचेचा टोनही सुधारतो.
3. त्वचा चमकदार
आजकाल प्रत्येक महिला निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी बाजारात उपलब्ध असलेली भरपूर उत्पादने वापरतात, ज्याचे कालांतराने दुष्परिणामही दिसू लागतात. त्याचवेळी अनेक महिला या घरगुती आणि नैसर्गिकरित्या उपायांचे अवलंब करतात. अशात तुम्हाला देखील चमकदार आणि निरोगी त्वचेसाठी रासायनिक उत्पादनापेक्षा बदामाची साल वापरू शकता. बदामाच्या सालीत व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते, जे त्वचेला पोषण देते आणि नैसर्गिक चमक प्रदान करते. यामुळे त्वचा खूप चमकते.
बदामाच्या सालीच्या या पद्धतीने वापर करा
स्क्रब बनवण्यासाठी : बदामाच्या सालीपासून स्क्रब बनवण्यासाठी सर्वात प्रथम बदामाच्या साली वाळवून त्यांची पावडर बनवा. त्यात मध आणि दही मिसळून पेस्ट तयार करा. या पेस्टचा मसाज हलक्या हातांनी चेहऱ्यावर स्क्रबप्रमाणे करा. त्यानंतर ५-७ मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका.
फेस मास्क बनवा : बदामाची साल बारीक करून वाटून त्यात कोरफड जेल आणि गुलाबजल मिक्स करा. त्यानंतर तयार झालेली पेस्ट तुम्ही चेहऱ्यावर आणि मानेवर लावा व १५ मिनिटांनी थंड पाण्याने धुवून टाका. बदामाच्या सालीच्या या मास्कमुळे तुमची त्वचा चमकदार होईल.
टॅन काढण्यासाठी उपयुक्त : बदामाच्या सालीची पावडर बनवून त्यात लिंबाचा रस आणि बेसन मिक्स करून घ्या. त्यानंतर टॅन झालेल्या त्वचेवर ही पेस्ट लावून थोड्या वेळात चेहरा स्वच्छ धुवून टाका. टॅन काढून टाकण्यासाठी हे खूप प्रभावी आहे.
डार्क सर्कलसाठी : बदामाची साल बारीक करून त्यात दूध मिक्स करा. तयार केलेली पेस्ट डोळ्यांच्या खाली लावा, त्यानंतर १० मिनिटांनी थंड पाण्याने स्वच्छ करा. यामुळे डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)