मसूर डाळीचा असा बनवा फेस पॅक, चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यास उपयुक्त

जेव्हा स्किन केअर करण्याचा विचार येतो तेव्हा बहुतेक लोकं बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या प्रॉडक्टकडे धाव घेतात, परंतु तुम्हाला माहित आहे का की तुमच्या स्वयंपाकघरातील सामान्य गोष्ट देखील तुमची त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर बनवू शकते. आपण आपल्या जेवणात सामान्यतः मसूर डाळीचा वापर करतो, पण आरोग्यासोबतच या डाळीचे सौंदर्य फायदेही कमी नाहीत. ही डाळ त्वचा स्वच्छ करण्यासाठी, एक्सफोलिएशन करण्यासाठी आणि चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते.

उन्हाळ्याच्या दिवसात महिलांना त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी घरगुती उपायांचा अवलंब करायला आवडतो. अशावेळेस तुम्ही मसूर डाळीचा फेसपॅक बनवा. कारण हा फेस पॅक तुमच्या त्वचेतील मृत पेशी काढून टाकतोच, शिवाय त्वचा गुळगुळीत आणि स्वच्छ देखील करतो. चला तर मग आजच्या या लेखात आपण मसुर डाळीचा वापर कोणत्या पद्धतीने तुम्ही करू शकाल. तसेच घरच्या घरीच चेहऱ्यावरील नको असलेले केस कसे काढाल तेही कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय ते आपण जाणून घेऊयात…

मसूर डाळ चेहऱ्यावरील केस कसे काढते?

मसूर डाळीमध्ये स्क्रबिंग गुणधर्म असतात जे त्वचेवरील मृत पेशी आणि बारीक केस हळूवारपणे काढून टाकण्यास मदत करतात. यामुळे त्वचा स्वच्छ आणि गुळगुळीत होते. याचा नियमित वापर केल्याने चेहऱ्यावरील केसांची वाढ कमी होते आणि त्वचेला टोन आणि उजळपणा येतो.

मसूर डाळीपासून बनवलेले फेस पॅक

1. मसूर डाळ आणि दुधाचा फेस पॅक – मसूर डाळ बारीक करून त्यात दूध आणि हळद टाकून त्याची पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटे तसेच राहू द्या. ते सुकल्यानंतर हलक्या हाताने घासून धुवा. आठवड्यातून दोनदा वापरा. हे पॅक चेहऱ्यावरील नको असलेले केस हळूवारपणे घासून काढून टाकते आणि त्वचा मऊ ठेवते.

2. मसूर डाळ आणि बेसनाचा पॅक- दोन्ही घटक एकत्र करून घट्ट पेस्ट बनवा. ते चेहऱ्यावर लावून तसेच राहू द्या. त्यानंतर सुकल्यावर ते तुमच्या बोटांनी घासून थंड पाण्याने धुवा. हे पॅक चेहऱ्यावर नको असलेल्या केसांना कमकुवत करते आणि ते पुन्हा पुन्हा वाढण्यापासून रोखते. ते त्वचेला टोन आणि स्वच्छ देखील करते.

3. मसूर डाळ आणि मधाचा पॅक- आता मसुर डाळ बारीक करून त्यात मध चांगले मिक्स करून चेहऱ्यावर लावा. हलक्या हातांनी स्क्रब करा व 15-20 मिनिटांनी चेहरा धुवा. मध त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि मसूर केस काढून टाकते. तसेच तुम्ही यात मधा ऐवजी कोरफड जेल सुद्धा मिक्स करू शकता. कारण कोरफडीचे जेल त्वचेला थंड करते आणि जळजळीपासून वाचवते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)