सणवार असो किंवा कोणताही कार्यक्रम प्रत्येक महिला व मुली मेकअप करतातच. प्रत्येकीला वाटते की आपले सौंदर्य आणखीन खुलून उठावे यासाठी मेकअप केला जातो. मेकअप केल्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे मेकअप रिमुव्ह करणे. यासाठी प्रत्येकजण मेकअप काढण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले मेकअप रिमुव्हर तसेच क्लिंझर यांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. परंतू प्रत्येक वेगवेगळ्या क्लिंझरमध्ये अनेक प्रकारे कॅमिकलचा वापर करतात. त्यामुळे त्यांचा दररोज वापर केल्याने त्वचेलाही नुकसान होऊ शकते.
मेकअप काढण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय देखील वापरू शकता. घरी उपलब्ध असलेल्या काही नैसर्गिक गोष्टी त्वचेवरील मेकअप काढून टाकण्यास तसेच त्वचा चमकदार ठेवण्यास मदत करू शकतात. चला तर मग जाणुन घेऊयात या घरगुती उपायांबद्दल.
गुलाब पाणी आणि जोजोबा तेल क्लिंझर
एक चमचा गुलाबपाण्यात समान प्रमाणात जोजोबा तेल मिक्स करा. यानंतर तयार झालेले घरगुती क्लिंझर कापसावर घेऊन याचा वापर मेकअप काढण्यासाठी करा. यामुळे तुमच्या त्वचेलाही नुकसान होणार नाही. कोरडी त्वचा असलेल्यांसाठी हे विशेषतः चांगले असेल. गुलाबपाणी चेहरा हायड्रेट ठेवण्यास मदत करते आणि जोजोबा तेल त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते.
गुलाब पाणी आणि कोरफड जेल क्लिंझर
गुलाबपाणी आणि कोरफडीचे जेल दोन्ही त्वचेसाठी फायदेशीर आहेत. गुलाबपाणी त्वचेला थंडावा देते. तर कोरफडीचा जेल त्वचा मऊ आणि चमकदार बनवण्यास मदत करतो. यासाठी तुम्हाला 2 चमचे गुलाबपाण्यात 1 चमचा कोरफड जेल मिसळा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही त्यात 1-2 थेंब खोबरेल तेल देखील मिक्स करू शकता. एका भांड्यात गुलाबपाणी आणि कोरफड जेल चांगले मिसळा. हे मिश्रण हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा. नंतर ते ओल्या कापडाने किंवा कापसाने स्वच्छ करा. हे क्लीन्सर त्वचेला हायड्रेट करते आणि मेकअप सहजपणे काढण्यास मदत करते.
कच्चे दूध क्लिंझर
कच्चे दूध हे एक नैसर्गिक क्लिंझर आहे. हे त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास आणि मेकअप सहजपणे काढण्यास मदत करते. 1-2 चमचे कच्चे दूध घ्या. कापसाच्या साहाय्याने कच्च दुध घेऊन ते हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा आणि मेकअप स्वच्छ करा. नंतर चेहरा पाण्याने धुवा. कोरडी त्वचा असलेल्या लोकांसाठी हे अधिक फायदेशीर घरगुती क्लिंझर आहे.
खोबरेल तेल क्लिंझर
मेकअप काढण्यासाठी देखील नारळ तेलाचा वापर केला जातो. यासाठी कापसावर खोबरेल तेल घेऊन हलक्या हाताने त्वचेवर मसाज करा. खोबरेल तेल मेकअप काढण्यास मदत करू शकते, तसेच खोबरेल तेल त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. अशा परिस्थितीत, कोरडी त्वचा असलेल्या लोकांसाठी ते योग्य ठरेल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)