बदलत्या वातावरणात आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण आपल्या आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश करत असतो. अशातच काहीजण सकाळच्या नाष्ट्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत फक्त हेल्दी आहार घेत असतात. ज्यामुळे त्यांचे आरोग्य तंदुरस्त राहते. तुम्ही सुद्धा चांगल्या आरोग्यासाठी आहारात मखान्याचे सेवन करा. मखाना केवळ चवीलाच नाही तर आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. मखान्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस सोबतच प्रथिने आणि फायबर सारखे पोषक घटक देखील चांगल्या प्रमाणात आढळतात. त्यात कमी कॅलरीज असतात. त्यामुळे मखान्याचे सेवन आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते.
मखान्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी आणि फायबर जास्त असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. त्याचबरोबर फायबरयुक्त आहारामुळे पोट बराच वेळ भरलेले वाटते, ज्यामुळे सतत खाण्याची इच्छा कमी होते. हे पचनासाठी देखील चांगले आहे. याशिवाय, त्यात कॅल्शियम आणि फॉस्फरस असते, जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. बहुतेक लोकांना दुधासोबत मखाना खायला आवडते, परंतु तुम्ही त्यातून खूप चविष्ट पदार्थ बनवू शकता आणि ते नाश्त्यात समावेश करून खाऊ शकता. चला तर मग जाणून घेऊयात मखान्यापासून कोणते पदार्थ तयार करतात येतात.
रोस्टेड मखाना
सर्वात सोपा मार्ग म्हणजे मखाना एका पॅनमध्ये सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. तुम्ही त्यात मीठ घालूनही खाऊ शकता. बरेच यासोबतच तूम्ही देशी तुपात मखाने रोस्ट करून देखील त्याचे सेवन करू शकता. तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार फक्त भाजून खाऊ शकता किंवा त्यात मीठ आणि चाट मसाला घालून ते मसालेदार बनवू शकता.
मखाना रायता
मखाना तव्यावर हलके तळून घ्या. आता एका भांड्यात दही घाला आणि त्यात चाट मसाला, जिरेपूड, मीठ आणि हिरवी मिरची घाला आणि चांगले मिक्स करा. या दह्यात भाजलेला मखाना बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि हिरवी कोथिंबीर घालून हे मिश्रण चांगले मिक्स करा आणि वर थोडा चाट मसाला टाका. अशाने तूमचा हेल्दी मखाना रायता तयार आहे, तो नाश्ता म्हणूनही खाऊ शकतात.
मखाना आणि ड्रायफ्रूट
एका पॅनमध्ये तूप घालून त्यात मखाना तळून घ्या आणि प्लेटमध्ये काढा. यानंतर, शेंगदाणे त्याच प्रकारे तळून घ्या. आता पॅनमध्ये तूप घाला, त्यात काजू, बदाम, कढीपत्ता आणि सुके खोबरे घाला आणि ते परतून घ्या. यानंतर त्यात मनुके घाला. आता भाजलेले शेंगदाणे आणि मखाने घालून चांगले मिक्स करा . आता यावर मीठ आणि काळी मिरी पावडर घाला. येथे, मखाना आणि सुक्या मेव्यांचा निरोगी आणि चविष्ट नाश्ता तयार आहे.
मखाना सॅलड
मखाना सॅलड हा देखील एक चविष्ट आणि आरोग्यदायी नाश्त्याचा पर्याय आहे. हे करण्यासाठी, प्रथम मखाना हलके तळून घ्या. यानंतर काकडी, टोमॅटो, कोथिंबीर , लिंबाचा रस, काळी मिरी आणि मीठ टाकून चांगले मिक्स करा. आता तूमचा मखाना सॅलड तयार आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही त्यात चाट मसाला देखील टाकू शकता.
मखाना नमकीन
मखाना नमकीन बनवण्यासाठी एका पॅनमध्ये तूप किंवा तेल गरम करा. त्यात मखाना घाला आणि मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत हलके भाजा. मखाना चांगला भाजल्यानंतर त्यात मीठ, हळद, लाल तिखट, जिरे आणि काळी मिरी टाकून चांगले मिक्स करा. त्यानंतर हे मिश्रण 2-3 मिनिटे तसेच ठेवा, जेणेकरून सर्व मसाले मखान्यात चांगले शोषले जातील. आता ते एका प्लेटमध्ये काढा आणि थंड होऊ द्या.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)