कोणत्या भागांना पावसाचा ‘अलर्ट’
आज राज्यातील कोकणसह विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांत मुसळधार पाऊस बरसणार आहे. तर दुसऱ्या बाजुला संपूर्ण विदर्भात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला अलर्ट जारी केला असून जोरदार पावसाची हजेरी लागणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यामध्ये इतका पाऊस
जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये मंगळवारी २ जुलैला सकाळी साडेआठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये १०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गंगापूर धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात २४ तासांमध्ये ५४.३ मिमी पाऊस नोंदविला गेला. दुपारपर्यंत सोसाट्याचा वारा वाहत असल्याने वाऱ्याचा वेगही १२ किमी प्रति तास नोंदविला गेला. बुधवारी ३ जुलैला देखील पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आल्याची माहिती हवामान विभागातील अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
कोकणसह उत्तर भागात पावसाचा जोर वाढला, आता विदर्भही ऑन अलर्ट
जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी दिवसभर आणि मंगळवारी सकाळी साडेआठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये सरासरी १०.८ मिमी पावसाची नोंद झाली. इगतपुरीमध्ये ३८ मिमी, सुरगाण्यात २४.२ मिमी, पेठमध्ये २२.१ मिमी पाऊस नोंदविला गेला. नाशिक आणि दिंडोरीतही अनुक्रमे १०.८ आणि १०.४ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. शहरात देखील ९.६ मिमी पाऊस झाला. दरम्यान बुधवारी जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. कळवण तालुक्यातील सप्तशृंगी देवी मंदिराकडे जाणाऱ्या घाट रस्त्यावर दगड पडल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर पडलेले दगड, माती बाजूला केली. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.