Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : परळीत ‘घड्याळा’चा गजर? शरद पवार यांचं टायमिंग चुकणार? काय सांगतो कल

पंकजा मुंडे, धनंजय मुंडेImage Credit source: Facebook

मराठवाड्यातील सर्वात हायप्रोफाईल लढत असलेल्या परळी मतदारसंघात धनंजय मुंडे मुसंडी मारतील का? यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात स्वतः शरद पवार यांनी रणनीती आखली होती. बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण यंदा पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक ही कमळ चिन्हावर नाही तर घड्याळावर लढवल्या जात आहे. त्यातच धनंजय मुंडे यांना टपाली मतांचा कौल नव्हता. पण ईव्हीएम मतांमध्ये त्यांनी मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे या मतदारसंघात अजित पवार गटाच्या घड्याळाचा गजर होणार का? की शरद पवार यांच्या डावपेचांना यश येईल हे लवकरच समोर येईल.

लोकसभेला मोठा फटका

मराठावाड्यातील 8 मतदारसंघात केवळ छत्रपती संभाजीनगर येथील एक जागा जिंकण्यात महायुतीला यश आले होते. तर सात जागा त्यांच्या हातून निसटल्या होत्या. बीड जिल्ह्यात तर हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता. रात्री उशीरा झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी तुतारी फुंकली होती. त्यांना 6500 मते मिळाली होती. या जिल्ह्यात सध्या विधानसभेचे 6 मतदारसंघ येतात. त्यात परळी आणि माजलगाव येथील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्याचे कल पाहता, धनंजय मुंडे यांनी आघाडी घेतली आहे. पहिल्यांदाच परळी विधानसभा मतदारसंघात घड्याळाचा प्रयोग होत आहे. आतापर्यंत या मतदारसंघात कमळ फुलेले होते. यंदा घड्याळाचा गजर होणार की, शरद पवार पॉवर दाखवणार हे समोर येईल.

धनंजय मुंडे यांना महायुतीकडून उमेदवारी

महायुतीत ही परळी विधानसभेची जागा ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी सोडण्यात आली. यापूर्वी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढवली होती. पण अजितदादा गट हा महायुतीत गेल्यानंतर ही जागा घड्याळासाठी सोडण्यात आली. दोन्ही बहिण-भावात दिलजमाई झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी लोकसभेत पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी मोठी कामगिरी बजावली होती. परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना 74 हजार 834 मतांची लीड मिळाली होती. आता धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. त्यात कोण बाजी मारणार हे लवकरच समोर येईल. सध्या त्यांना 9000 मतांची आघाडी मिळाली आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)