हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रात आणि घाट परिसरात देखील अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर मुंबई शहरासह उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, नाशिक, औरंगाबाद, जालना, नंदुरूबार या भागांत देखील मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राचे संचालक एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सुनील कांबळे म्हणाले, ‘आज मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. आम्ही मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईत २-३ दिवस हलका ते मध्यम प्रमाणात पाऊस पडणार आहे. तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाट भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
आकडेवारी मांडताना कांबळे पुढे म्हणाले, ‘मुंबईत सुमारे ५५० मिलिमीटर पाऊस पडला आहे, जो नेहमीपेक्षा २०० ते ३०० मिलिमीटरने कमी आहे. जूनमधील पावसाच्या स्थितीनुसार, मुंबईत पावसाचे प्रमाण कमी असले तरी ते पोषक आहे आणि अपेक्षेप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रासाठीही पोषक वातावरण आहे.’
जुलैचा अंदाज व्यक्त करताना कुंबळे म्हणाले, येत्या दोन-तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नाही. तरीही घाट भागातील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामानाची स्थिती सुधारल्यानंतर, आम्ही अतिमुसळधार पावसाबद्दल माहिती देऊच.