25 Nov 2024 09:27 AM (IST)
देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाला वाढता पाठिंबा
देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाला वाढता पाठिंबा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यानंतर अपक्षांचाही फडणवीसांना पाठिंबा. विधानसभेतील नवनिर्वाचित पाच आमदारांनी भाजपला पाठिंबा दर्शवला आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे आणि अशोकराव माने, युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा आणि अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.
महायुतीतील सर्वाधिक आमदारांची मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना पसंती आहे.
25 Nov 2024 09:23 AM (IST)
Maharashtra Government Formation : मुख्यमंत्रीपदाच्या 2 फॉर्म्युलावर महायुतीच्या बैठकीत चर्चा
मुख्यमंत्रीपदाच्या 2 फॉर्मुल्यावर महायुतीच्या बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्रीपदाचा अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युलावर शिंदे गट आग्रही आहे.
तर दुसरा फॉर्म्युला 2-2-1 यावरही चर्चा सुरू असून त्यासाठी अजित पवार गट आग्रही आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. 1 वर्ष अजित पवार , 2 वर्ष भाजप , 2 वर्ष शिंदे असे मुख्यमंत्रीपद मिळावे अशी मागणी असल्याचे समजते. आज तिन्ही नेते दिल्लीत जाण्याची शक्यता आहे.
25 Nov 2024 09:17 AM (IST)
सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरला ?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर सध्या महायुतीत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महायुतीचा मुख्यमंत्री कोण यावर सध्या विचारमंथन सुरू असून महायुतीत 2-2-1 असा सीएमपदाचा फॉर्म्युला असेल का यावर चर्चा सुरू आहे.