यंदाची महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली होती. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात बंडखोरी करत भाजपचा हात धरला. त्याचा फायदा त्यांना होताना दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाचे कल्याण-डोंबिवली उमेदवार श्रीकांत शिंदे हे आघाडीवर असताना दिसत आहे. टीव्ही ९ पोलस्टार्टने याबाबतचे आकडे प्रसिद्ध केले आहेत.
हेही वाचा – Parbhani Exit Poll : एक्झिट पोलचे सगळे सर्वे माझ्या बाजूने, १०० कोटी खर्चूनही जानकारांना फायदा नाही, संजय जाधवांनी डिवचले
लोकसभा निवडणुकीत यंदा महाराष्ट्रात तीन पक्षांनी युती करत निवडणूक लढली. याचा फायदा होईल असं भाजपला वाटलं होतं, मात्र, याउलट त्याचा तोटाच झाल्याचं निवडणुकांच्या निकालापूर्वी आलेल्या एक्झिट पोलमधून दिसून येत आहे. तर, त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत यांना महायुतीकडून कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. तर महाविकास आघाडीने येथून शिवसेनेच्या वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली. लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलमध्ये यंदा श्रीकांत शिंदे हे आघाडीवर असल्याचं दिसत आहे. तर त्यांच्या विरोधातील उमेदवार वैशाली दरेकर या पिछाडीवर आहेत.
टीव्ही ९ पोलस्ट्रार्टच्या एक्झिट पोलमध्ये कोणाला किती जागा मिळणार?
महायुती २२ जागा – (भाजप- १८, शिंदे गट-०४, अजित पवार गट-००)
महाविकास आघाडी २५ जागा – (ठाकरे गट- १४, शरद पवार गट-०६, काँग्रेस ०५)
एक्झिट पोलमध्ये भाजपला धक्का?
२०१९ च्या निवडणुकीत भाजपने २३ जागा जिंकल्या होत्या. मात्र, यंदाच्या निवडणूक निकालाच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला ६ जागांचा तोटा होणार असल्याचं दिसून येत आहे. या निवडणुकीत भाजपने २८ जागा लढवल्या असून त्यांना फक्त १७ जागा मिळणार असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.