महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघासाठी बुधवार (20 नोव्हेंबर) एका टप्प्यात मतदान झालं. राज्यभरात यंदा मतदानाचा टक्का वाढलेला दिसून आला. एकूण 66 टक्क्यांच्या आसपास यंदाच्या निवडणुकीत मतदान झालं असून 4136 उमेदवारांचं भविष्य मतपेटीत बंद झालं. निवडणुकीचा निकाल आता अवघ्या काही तासांवरच आला आहे. उद्या, अर्थात 23 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्वाचा असून सकाळी 7 पासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार येणार की महाविकास आघाडीचे की इतरांच्या मदतीने कुणाचे सरकार येणार हे उद्याच स्पष्ट होणार असून या निकालाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. उद्या मतदार कोणाला कौल देतात, बिग फाईट्समध्ये कोण विजयी होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राज्यात सत्ता कोण स्थापन करत याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात तीव्र लढत आहेत. या निवडणुकीत विविध पक्षांच्या अनेक बंडखोरांनी देखील आपलं नशिब आजमावलं आहे. या बंडोबांचं बंड रोखण्यात त्या त्या पक्षांना काही ठिकाणी अपयश आल्याने काही ठिकाणी तिरंगी लढत देखील होत आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचे उमेदवार यांच्यातच या निवडणुकीत थेट लढत आहे.
मुंबईत एकूण 36 विधानसभा मतदार संघ आहेत. तर ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातून एकूण 244 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यातील 138 कल्याण पश्चिम, 140 अंबरनाथ (अ.जा), 141 उल्हासनगर, 142 कल्याण पश्चिम, 145 मीरा भाईंदर, 150 ऐरोली विधानसभा या 6 मतदारसंघातील निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांची संख्या जास्त आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघात एकूण 303 उमेदवार उभे आहेत.
टीव्ही9 मराठीची विशेष तयारी
या सर्वांच्या भविष्याचा उद्या निकाल लागणार असून राज्यातील जनतेला मतमोजणी आणि निकालाची प्रत्येक अपडेट मिळावी म्हणून टीव्ही9 मराठीने खास तयारी केली आहे. तुम्ही टीव्ही9 मराठी चॅनल, टीव्ही9 मराठी युट्यूब लाइव्ह, टीव्ही 9 मराठी संकेतस्थळ आणि टीव्ही9 मराठीच्या लाइव्ह टीव्हीवर जाऊन निकालाची संपूर्ण माहिती घेऊ शकता. सर्वात फास्ट अपडेट्स तुम्हाला टीव्ही9 मराठीवर पाहायला मिळणार आहेत.
मतमोजणी आणि निकालाचे अपडेट कुठे पाहाल?
https://www.tv9marathi.com/live-tv
https://www.tv9marathi.com/