महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. आज मतमोजणी सुरु आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने मैदानात उतरली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात 49 सभा घेतल्या होत्या. मनसेने 130 पेक्षा जास्त जागांवर उमेदवार उभे केले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेला अनुकूल वातावरण असं दिसत होतं. पण प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अशी स्थिती दिसत नाहीय.
मतमोजणी सुरु होऊन आता दीड तासापेक्षा जास्त वेळ झालाय. पण मनसेचा उमेदवार एकाही जागेवर आघाडीवर नाहीय. सुरुवातीला माहीम विधानसभा मतदारसंघात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी आघाडी घेतली होती. पण आता ते पिछाडीवर आहेत. शिवडीत काँटे की टक्कर सुरु आहे. बाळा नांदगावकर यांना अजूनपर्यंत अजय चौधरींची आघाडी मोडता आलेली नाहीय. ठाणे शहर या मतदारसंघातून मनसेला अपेक्षा होत्या. ठाणे शहरमधून जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव निवडणूक लढवत आहेत. पण भाजपचे संजय केळकर आघाडीवर आहेत.
मुंबईत भाजपच मोठा पक्ष
मुंबईत मनसेचा परिणाम दिसून येईल ही अपेक्षा फोल ठरली आहे. मुंबईत भाजपच मोठा पक्ष ठरलाय. त्यांचे उमेदवार 18 जागांवर आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गट 3 जागांवर आघाडीवर आहेत. काँग्रेस 4 आणि उद्धव ठाकरे गट 6 जागांवर आघाडीवर आहे.
बातमी लिहितानाचे अपडेट्स
Mahim Election Result 2024 : माहीममध्ये गणित बदललं, आता कोण आघाडीवर?
माहीम विधानसभा मतदारसंघातून आता उद्धव ठाकरे गटाच्या महेश सावंत यांनी आघाडी घेतली आहे. मनसेच्या अमित ठाकरे आणि महेश सावंत यांच्या मतांमध्ये फार थोडा फरक आहे. अमित ठाकरे यांच्याकडे 2156 तर महेश सावंत यांना 2,270 मतं आहेत. सदा सरवणकर तिसऱ्या स्थानावर आहेत.
Shivdi Election Result 2024 : शिवडीत अजय चौधरी यांच्याकडे फार छोटी आघाडी
शिवडीतून अजय चौधरी फक्त 356 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्यासमोर मनसेच्या बाळा नांदगावकर यांचं आव्हान आहे.