छगन भुजबळ, नेते राष्ट्रवादीImage Credit source: Facebook
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालाचा आज दिवस आहे. राज्यात कोणाचे सरकार येणार? हे स्पष्ट होणार आहे. या निवडणूक निकालापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आणि शिंदे मंत्रिमंडळातील मंत्री छगन भुजबळ यांनी महत्वाचे विधान केले आहे. बंटेंगे तो कटेंगे’ महाराष्ट्रात चालले नाही, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महायुतीचे सरकार येणार
निकालावर मत व्यक्त करताना छगन भुजबळ म्हणाले, राज्याचा निकाल हा स्पष्ट आहे. अनेक सर्व्हे करणाऱ्या संस्थांनी जनतेचा कल सांगितला आहे. त्यामुळे राज्यात महायुती सरकार बनवणार आहे. कोण म्हणते बहुमतापेक्षा महायुतीला दहा जास्ती असेल, कोण म्हणते पन्नास जागा जास्त असतील, कोणी म्हणते पंचवीस जागा जास्त असेल. परंतु महायुतीचे सरकार बनवणार आहे. महाविकास आघाडीला जनतेने नाकारले आहे.
या मुद्यांवर मतदान
कोणत्या मुद्द्यावर निवडणूक झाली, त्यावर छगन भुजबळ म्हणाले, बटेंगे ते कटेंगे हा मुद्दा महाराष्ट्रात चाललेला नाही. परंतु राज्यात महायुतीची लोकप्रिय योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण चालली आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज हा विषय चालला आहे. मुलींना मोफत शिक्षणाला प्राधान्य मिळाले आहे. महायुती सरकारने गरिबांना अनेक चांगल्या योजना दिल्या आहे, त्या योजनेवर जनतेने महायुतीला मतदान केले आहे.
राष्ट्रपती राजवट नाही
विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यावर 48 तासांच्या आता सरकार बनवणार आहोत, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. आम्ही सरकार बनवणार आहे, त्याची काळजी करू नका. राज्यात राष्ट्रपती राजवटीची अजिबात शक्यता नाही, असा ठाम विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.
उत्तर महाराष्ट्रातील निवडणूक निकालाचे प्रत्येक अपडेट
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Counting