महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा?

राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी पदाचा राजीनामा देऊ शकतात. पण त्यानंतर ते हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिलीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या राज्यपालांकडे राजीनामा सोपवणार आहेत. त्यानंतर आता नवीन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधीपर्यंत ते हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. मुख्यमंत्रिपदाबाबत अजून राज्यात सस्पेंस कायम आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी स्पष्ट केलंय की मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. हा निर्णय महायुतीतील मित्रपक्ष एकत्र बसून घेणार आहेत. ते म्हणाले की विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी महाविकासआघाडीकडे पुरेशी संख्याही नाही.

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयात लाडकी बहीण योजनेचा महत्त्वाचा वाटा असल्याची कबुली महायुतीचे नेते देत आहेत. ही योजना महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करते. आज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथील ‘प्रीतीसंगम’ या स्मृतीस्थळावर उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

27 नोव्हेंबरपूर्वी जर सरकार स्थापन झाले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल अशी देखील चर्चा आहे. ते म्हणाले की, आता आमच्याकडे एवढा मोठा जनादेश आहे की विरोधी पक्षाच्या नेत्याला उमेदवारी देण्याइतके संख्याबळही त्यांच्याकडे नाही. ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. विधानसभेतील विरोधी पक्ष आणि इतर सदस्यांचा आदर करण्याची परंपरा फडणवीस आणि शिंदे कायम ठेवतील, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झालाय. राज्यात भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरलाय. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र विधानसभेच्या 288 पैकी 230 जागा जिंकल्या आहेत. आता मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण त्यांच्या पक्षाने राज्यात 149 जागा लढवल्या आणि 132 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे पक्षाने फडणवीसांच्या नेतृत्वात हा रेकॉर्ड नोंदवला आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)