Maharashtra Breaking News LIVE : ठरलं, ‘या’ तारखेला होऊ शकतो राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार

महाराष्ट्रातील दिग्गज नेते शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीतल्या घराबाहेर शुभेच्छांचे पोस्टर्स लागले आहेत. दिल्लीसह राज्यातल्या पदाधिकाऱ्यांकडून शरद पवार यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. बैठकीच्या निमित्ताने अजित पवार आणि सुनेत्रा पवारही दिल्लीतच आहेत. अजित पवार शरद पवारांना शुभेच्छा देणार का? याची राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. भारतीय राजकारणातील चाणक्य, शेतकरी नेते, विकास पुरुष असा शरद पवार यांचा पोस्टर्सवर उल्लेख आहे. आज अनेक नेते पवारांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी येणार. खड्ड्यांना कारणीभूत ठरणाऱ्या 18 ठेकेदारांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. हायकोर्टाच्या आदेशानंतर महापालिकेची कारवाई. महापालिकेकडून ठेकेदारांना खड्ड्याबाबत कारणे दाखवा नोटीसा देण्यात आल्या आहेत. न्यायालयाने कान टोचल्यानंतर महापालिकेने पावलं उचलली. शहरातील रस्त्यांवर अल्पावधीतच खड्डे पडल्याने जनहित याचिका करण्यात आली होती. महापालिकेला खड्डे बुजवल्याचा अहवाल सादर करण्याचा निर्देश देण्यात आले आहेत.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)