Maharashtra Breaking News LIVE 6 May 2025 : ठाण्यातून 17 पाकिस्तानी नागरिक परतीच्या मार्गावर
  • 06 May 2025 08:42 AM (IST)

    नाशिक – शिखर समितीच्या बैठकीत आज त्रंबकेश्वर आराखड्यावर चर्चा

    नाशिक – शिखर समितीच्या बैठकीत आज त्रंबकेश्वर आराखड्यावर चर्चा होणार आहे. चौंडी येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीसह शिखर समितीची ही महत्त्वपूर्ण बैठक आहे. राज्याचे प्रधान सचिव शिखर समिती समोर आराखडा सादर करणार आहेत. त्र्यंबकेश्वरसाठी प्रत्यक्षात अकराशे कोटी रुपयांचा आराखडा आहे. आजच्या बैठकीत विकास आराखडा निश्चित होईल असा विश्वास व्यक्त होतोय.

  • 06 May 2025 08:34 AM (IST)

    ठाणे महापालिकेच्या मालमत्ता करात वाढ

    ठाणे महापालिकेच्या मालमत्ता करात वाढ करण्यात आली असून पहिल्याच महिन्यात 95 कोटींची मालमत्ता कर वसुली झाली. मागील वर्षाच्या तुलनेत 12 कोटींची अधिक वसुली झाली. पालिकेने मालमत्ता कर विभागाला 819 कोटी 71 लाख रुपयांच्या कर वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे.

  • 06 May 2025 08:26 AM (IST)

    पुणे- अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल

    पुणे- अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून एका तरुणाने तिच्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न करून संबंधित प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून राहुल राम कुमार असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

  • 06 May 2025 08:23 AM (IST)

    ठाणे जिल्ह्यात ताप, उल्टी, जुलाबाचे रुग्ण वाढले

    ठाणे जिल्ह्यात ताप, उल्टी, जुलाबाचे रुग्ण वाढले आहेत. तापाचे एकूण रुग्ण १७३१ आहेत. यापैकी बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतलेले तापाचे रुग्ण 1264, तर अंतररुग्ण विभागात उपचार घेतलेल्या तापाचे रुग्ण 550 आहेत. बाह्य रुग्णविभागात उपचार घेतलेले जुलाबाचे रुग्ण 12 आहेत, तर अंतररुग्ण विभागात उपचार घेतलेले जुलाबाचे रुग्ण 101 आहेत. शासकीय रुग्णालयात सध्या व्हायरल फिव्हरचे रुग्ण वाढले आहेत.

  • 06 May 2025 08:22 AM (IST)

    भाडे नाकारणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांची खैर नाह

    मुंबईत प्रवाशांना अडचणीत टाकणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली. दोन आठवड्यांत ४८,४१७ बेशिस्त चालकांवर ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करत ४० लाख रुपयांचा दंड वसूली केली. तर भाडे नाकारणाऱ्या २८,८१४ चालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी आरटीओकडे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत.

  • 06 May 2025 08:20 AM (IST)

    ठाण्यातून 17 पाकिस्तानी नागरिक परतीच्या मार्गावर

    ठाणे जिल्ह्यातून म्हणजेच ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून 17 पाकिस्तानी नागरिक परतीच्या मार्गावर आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर ठाण्यातील तात्पुरत्या व्हिसावर आलेल्या नागरिकांना परत पाठवण्याच्या प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. 17 पैकी काही जण नातेवाईकांच्या लग्नासाठी, काहीजण पर्यटनासाठी आणि मित्राला भेटण्यासाठी आले होते.

  • (सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)