राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आज महत्वाचा दिवस आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचे संकट असणार आहे. पुण्यात मेट्रो प्रकल्पासाठी महापालिकेच्या 28 जागा महा मेट्रोला मालकी हक्काने मिळणार आहे. १ मेपासून राज्यभर ‘एक जिल्हा, एक नोंदणी’ उपक्रम सुरू झाला आहे. आता राज्यातील कोणत्याही तालुक्यात दस्त नोंदणी करणे शक्य होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ९,४२६ खासगी ट्रॅव्हल्स बसपैकी ४९० बस आरटीओ तपासणीत ‘अनफिट’ आढळल्या आहेत. तीव्र उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील जलसाठा २३ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पाणी टंचाईचे संकट आहे. याशिवाय देश-विदेश, महाराष्ट्र, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेटस वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
Maharashtra Breaking News LIVE 5 May 2025 : मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
