04 Mar 2025 08:41 AM (IST)
एक मुख्यमंत्री अशा मंत्र्याला बडतर्फ का नाही करू शकत?- अंजली दमानिया
“मला राग येत आहे. राजीनामा अजून आहे, अजून राजीनामा आहे. इतकं सगळं बघून सुद्धा यांना राजीनामा आहे. एक मुख्यमंत्री अशा मंत्र्याला बडतर्फ का नाही करू शकत? असा मंत्री नको हे आदेश का देत नाहीत,” असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.
04 Mar 2025 08:39 AM (IST)
फडणवीस, अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात काल बैठक पार पडली
देवगिरीवर काल तातडीची बैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात ही बैठक पार पडली. उद्या राजीनामा द्या, असं फडणवीसांनी काल रात्रीच मुंडेंना सांगितलं.
04 Mar 2025 08:33 AM (IST)
ड्रग्ज प्रकरणातील मुंबईतील महिला आरोपी संगीता गोळेच्या पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला
ड्रग्ज प्रकरणातील मुंबईतील महिला आरोपी संगीता गोळेच्या पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. संगीता गोळेला न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे ८ मार्चपर्यंत आता कोठडीत मुक्काम वाढला आहे. तुळजापूर ड्रग्ज रॅकेटमधील आणखी काही आरोपींचा शोध सुरू असल्यानं संगीता गोळीच्या कोठडीत वाढ करण्यात आली.
04 Mar 2025 08:26 AM (IST)
मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगितलं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगितलं असल्याची माहिती समोर येत आहे. काल रात्रीच फडणवीसांनी मुंडेंना राजीनामा द्यायला सांगितलं.
04 Mar 2025 08:24 AM (IST)
सांत्वनासाठी आलेल्या मनोज जरांगेंना मिठी मारुन धनंजय देशमुख रडले
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मनोज जरांगे हे त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या भेटीला गेले आहेत. सांत्वनासाठी आलेल्या मनोज जरांगेंना मिठी मारुन धनंजय देशमुख रडले. हत्येचे फोटो व्हायरल होताच त्यांच्या भावनांचा बांध फुटला.