Maharashtra Breaking News LIVE 28 April 2025 : पहलगाममधील हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर विधानसभेचे आज विशेष अधिवेशन

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीर विधानसभेचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन सोमवारी जम्मूमध्ये होणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध प्रस्ताव विधानसभेत मांडला जाईल.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. एकूण 18 जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. नाशिक येथील दर्गा प्रकरणी दंगलीतील संशयितांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. समीर पठाण, गुफरन तांबोळी या दोघांची पोलीस कोठडी आज संपणार आहे. राज्यातील अनेक भागांत पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. यासह राज्यातील, देशभरातील सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)