महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. तुमचाही संतोष देशमुख केला जाईल अशी धमकी धाराशिवचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत व केशव सावंत यांना पत्रातून देण्यात आली आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे. सर्वाधिक जागा असल्याने राष्ट्रवादीची दावेदारी मजबूत आहे तर मागील कामांचा संदर्भ देत दादा भुसेंकडून देखील पालकमंत्री पदावर दावा करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून राधानगरी धरण परिसरात धुक्याची चादर पसरली आहे. राज्यात 26 आणि 27 डिसेंबरला मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 26 तारखेला धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिकमध्ये तर 27 तारखेला अहिल्यानगर, सभाजीनगर, पुणे, जालना, बीडसह इतर जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यांसह अनेक महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग दिवसभर फॉलो करा.
Maharashtra Breaking News LIVE 24 December 2024 : नाशिकच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू
