Maharashtra Breaking News LIVE 17 June 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी 7 च्या परिषदेत बोलणार

गेल्या अनेक दिवसांपासून मंदावलेल्या पावसाने सोमवारी सकाळपासून मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांत जोरदार हजेरी लावली. रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस असून रत्नागिरीच्या काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांत पावसाचा जोर होता. तर आणखी काही दिवस मुंबई महानगर प्रदेशासह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा मुक्काम कायम असेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी 7 च्या परिषदेत बोलणार आहेत. 14 देशांचे राष्ट्राध्यक्ष या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. कॅनडामध्ये आज जी 7 परिषद पार पडणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह कॅनडा, जपान, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, इटली हे देशसुद्धा सहभागी होणार आहेत. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्सकी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबतही पंतप्रधान मोदी द्विपक्षीय संवाद साधण्याची शक्यता आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी हे जी 7 परिषदेत काय बोलणार याकडे देशाचं लक्ष लागून आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)