21 Dec 2024 10:24 AM (IST)
आज जालना जिल्हा बंदची हाक
परभणी घटनेच्या निषेधार्थ आज जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. सकल आंबेडकर समाज आणि सकल वडार समाजाच्या वतीने ही बंदची हाक देण्यात आली आहे. या आवाहनानंतर जालना कृषी उत्पन्न बाजार समिती देखील बंद राहणार असून शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल आणू नये असा आवाहन देखील करण्यात आलं आहे. आज दुपारी आंबेडकरी समाजाच्या वतीने शहरांमध्ये निदर्शने देखील करण्यात येणार आहेत.
21 Dec 2024 10:23 AM (IST)
मराठी कुटुंब मारहाण प्रकरण, आणखी दोघांना अटक
कल्याण योगीधाम अजमेरा सोसायटी मारहाण प्रकरण. मुख्य आरोपी अखिलेश शुक्लासह त्यांचे दोन सहकारी सुमित जाधव आणि दर्शन बोराडे यांना पोलिसांनी काल केली अटक. आज अखिलेश शुक्लाच्या पत्नी गीता शुक्लासह आणखी दोन आरोपीना घेतलें ताब्यात. एकूण सहा आरोपीं पोलिसांच्या ताब्यात असून अजून चार आरोपींचा शोध सुरू आहे. या सर्व आरोपींना आज दुपारी कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार.
21 Dec 2024 10:21 AM (IST)
नथुराम गोडसे याचा यथोचित सन्मान करा – सरहदला धमकी
“दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नथुराम गोडसे याचा यथोचित सन्मान करा”. साहित्य संमेलनाची आयोजक संस्था सरहदला धमक्यांचे फोन. फक्त गोडसेच नाही, तर सावरकर यांचं देखील नाव संमेलनातील ठिकाणांना द्यावं अशी मागणी. जर तसं झालं नाही, तर संघर्ष अटळ असल्याचाही धमकीत उल्लेख.
21 Dec 2024 10:17 AM (IST)
काहीही करुन BMC निवडणूक जिंकावी लागेल – संजय राऊत
बीएमसी निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंसोबत चर्चा सुरु झालीय. स्थानिक पातळीवर स्वबळाची मागणी असतेच. महाविकास आघाडी अजूनही आहे. आम्हाला काहीही करुन मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकावी लागेल असं खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.