18 Dec 2024 08:15 AM (IST)
भीमा कोरेगाव प्रकरणात आज आयोगासमोर सुनावणी
प्रकाश आंबेडकर राहणार सुनावणीला हजर. भीमा कोरेगाव इथं झालेल्या दंगलीची चौकशी भीमा कोरेगाव आयोगासमोर होत आहे. या प्रकरणात साक्षही नोंदवण्यात आल्यात. आज प्रकाश आंबेडकर 11 वाजता आयोगात हजर राहणार. त्या नंतर माध्यमांशी साधणार संवाद.
18 Dec 2024 08:14 AM (IST)
रत्नागिरी- जयगड येथील जिंदाल पोर्टमधील वायू गळती प्रकरण
जयगड येथील जिंदाल पोर्टमधील वायू गळती प्रकरण. जिल्हा शासकीय रुग्णालय मधून डिस्चार्ज मिळालेली मुलं पुन्हा रुग्णालयात. 31 जणांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू. 29 विद्यार्थी पुन्हा रुग्णालयात, तर 2 प्रौढांवरही उपचार सुरू. पोट दुखणे, जळजळ, डोळ्यांची आग होणे, चक्कर येणे, चालल्यानंतर अशक्तपणा वाटणे असा त्रास होतोय.
18 Dec 2024 08:13 AM (IST)
राज्य सरकारच्या वयोश्री योजनेचा किती लाख ज्येष्ठांना मिळणार लाभ
राज्य सरकारच्या वयोश्री योजनेचा ज्येष्ठांना लाभ. राज्यात 13 लाख अर्ज ठरले पात्र. सर्वाधिक अर्ज नागपूर आणि पुणे विभागात. वयोवृद्ध व्यक्तींना वयोश्री योजनेअंतर्गत 3 हजार रुपये प्रतिमहिना दिले जातात. राज्यात सर्वाधिक 69 हजार अर्ज हे पुणे जिल्ह्यातील आहेत
18 Dec 2024 08:11 AM (IST)
एकनाथ शिंदेंचा आमदार मंत्री झाला म्हणून काँग्रेसच सेलिब्रेशन
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर डोंबिवलीत काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बॅनरबाजी. शहरभरात पदाधिकाऱ्यांनी ही बॅनरबाजी करत मिठाई वाटप आणि फटाक्यांची आतषबाजी करत केला जल्लोष. प्रताप सरनाईक यांचा प्रवास डोंबिवलीतून सुरू झाला असून आता ते मंत्री झाल्यामुळे आम्हाला त्यांचा अभिमान असल्याचे सांगत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.